शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : शुक्रवार, 30 सप्टेंबर 2022 (09:43 IST)

महाराष्ट्राची परंपरा जोपासणारा उत्सव 'भोंडला'

Bhondla festival
नवरात्र म्हटले की सर्वत्र एक चैतन्यमयी आणि उत्साहवर्धक पावित्र्य असे वातावरण होत आणि नवरात्र म्हटलं की आठवण येते ती भोंडल्याची ज्याला भुलाबाई किंवा हादगा असे ही म्हणतात. हा उत्सव खास स्त्रियांसाठी साजरा होतो. वेग-वेगळ्या क्षेत्रात ह्याचे वेग-वेगळे नावे आहेत.
 
हा सण आश्विन महिन्यात हस्त नक्षत्र लागल्या पासून सुरू होतो. हा अधिकतर महाराष्ट्रात आणि कोंकणात प्रचलित असलेला सण आहे. या उत्सवात बायका, मुली समुदायाच्या रूपाने खेळ खेळतात. नवरात्राच्या नऊ दिवसात कधी ही आपल्या सोयीनुसार हा खेळ खेळतात. घटस्थापने पासून ते कोजागरी पर्यंत कधीही भोंडला करू शकतो. 
 
हा खेळ मोकळ्या जागीच जसे की अंगणात किंवा गच्चीवर खेळतात. या खेळात एका पाटावर रांगोळीने हत्ती काढून किंवा हत्तीची प्रतिमा ठेवून त्याची पूजा करतात. त्या पाटाच्या भोवती जमलेल्या सगळ्या बायका आणि मुली छोट्या आणि मोठ्या असे मिळून फेर धरतात. आप-आपल्या घरून काही गोड किंवा तिखट खाद्य पदार्थ बनवून आणतात ज्याला खिरापत असे म्हणतात. हा खेळ प्रत्येकीच्या घरी देखील एक-एक दिवस ठरवून करता येतो. या खेळात मधोमध पाटावर हत्ती ठेवून भोंडल्याची गाणी म्हणत फेर धरतात. 
 
आता आपल्या मनात असा प्रश्न येणार की हत्तीचं का ठेवतात? तर या मागील कारण असे आहे की हत्तीला समृद्धीचे भरभराटीचे आणि शक्तीचे प्रतीक मानले आहेत. तसेच हा सण म्हणजे आपल्या पृथ्वीच्या सुफलीकरणाचा सण मानला जातो. म्हणून बायकांच्या प्रगतीसाठी हा सण साजरा करण्याची पद्धत आहे. बऱ्याच ठिकाणी घाटावर कुमारिका पाटावर धान्याचा हत्ती मांडून त्याची पूजा करतात आणि फेर धरून गाणी म्हणतात. घराच्या भिंतींवर सोंडेत माळ धरलेल्या दोन अमोर-समोर तोंड केलेल्या हत्तीचे चित्र लावतात. त्यांचा वर रंगीत फुलांच्या माळ घालतात आणि फेर धरून भोंडल्याची गाणी म्हणतात. 
 
आपल्या महाराष्ट्राची पारंपरिक संस्कृतीची जोपासना करणारा हा आनंददायी सण म्हणजे भोंडला सर्वानीच साजरा केला पाहिजे. आता हा सण घरघुती नसून सामाजिक स्वरूपात साजरा करतात. बऱ्याचशा सामाजिक संस्था देखील महिला मुलींसाठी मोठ्या प्रमाणात भोंडल्याचा आयोजन करतात.आणि आपली परंपरा जपण्याचा प्रयत्न करतात. चला तर मग आपण देखील भोंडला करून आपल्या संस्कृतीची जोपासना करावी.