शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : बुधवार, 19 डिसेंबर 2018 (10:32 IST)

घरातील देवघरासाठी लक्षात ठेवा या लहान सहानं गोष्टी

अधिकतर घरांमध्ये देवी-देवतांसाठी वेगळी जागा असते. काही घरांमध्ये लहान लहान मंदिर बनवण्यात येतात. रोज देवघरात ठेवलेल्या देवांची पूजा केल्याने त्याचे शुभ फल नक्कीच मिळतात. घरातील वातावरण पवित्र असतं, ज्याने महालक्ष्मी समेत सर्व देवांची कृपा तुमच्यावर नेहमी असते. येथे काही अशा गोष्टी सांगण्यात येत आहे, ज्या घरातील मंदिरासाठी आवश्यक आहे. जर ह्या लहान लहान गोष्टींकडे लक्ष्य दिले तर पूजेचे श्रेष्ठ फल मिळतात आणि लक्ष्मीची कृपा होऊन घरात धन-धान्याची कधीच कमी पडत नाही.  
 
1. पूजा करताना तुमचे तोंड कुठल्या दिशेत असायला पाहिजे  
घरात पूजा करणार्‍या व्यक्तीचे तोंड पश्चिम दिशेकडे असणे शुभ समजले जाते. यासाठी देवघराचे दार पूर्वीकडे असायला पाहिजे. हे शक्य नसल्यास पूजा करताना व्यक्तीचे तोंड पूर्वेकडे असेल तर देखील श्रेष्ठ फल प्राप्त होतात.  
 
2. देवघरात मूर्त्या कशा प्रकारच्या असायला पाहिजे  
घरातील देवघरात जास्त मोठ्या मूर्त्या नाही ठेवायला पाहिजे. शास्त्रानुसार असे सांगण्यात आले आहे की जर आम्हाला मंदिरात शिवलिंग ठेवायचे असेल तर ते शिवलिंग आमच्या अंगठ्याच्या आकाराहून मोठे नसावे. शिवलिंग फार संवेदनशील असते म्हणून घरातील देवघरात लहानसे शिवलिंग ठेवणे शुभ असते. अतर देवी देवतांच्या मूर्त्यापण लहान आकाराच्या असाव्या.
3. मंदिरापर्यंत पोहोचायला पाहिजे सूर्याचा प्रकाश आणि ताजी हवा
घरात मंदिर अशा जागेवर बनवायला पाहिजे जेथे दिवसभरात थोड्या वेळेसाठी ना होईना पण सूर्याचा प्रकाश अवश्य पडायला पाहिजे. ज्या घरात सूर्याचा प्रकाश आणि ताजं वार येत, त्याच्या घरातील बरेचशे दोष स्वत:हून दूर होतात. सूर्याच्या प्रकाशामुळे वातावरणाची    नकारात्मक ऊर्जा समाप्त होते आणि सकारात्मक ऊर्जेत वाढ होते.  
 
4. पूजेच्या साहित्याशी निगडित काही गोष्टी  
पूजेत शिळे फूल, पान देवाला कधीही अर्पित नाही करावे. स्वच्छ आणि ताज्या पाण्याचा उपयोग करावा. या संबंधात हे लक्षात ठेवण्यासारखे म्हणजे तुळशीचे पान आणि गंगाजल कधीच शिळे होत नाही. म्हणून यांचा उपयोग कधीही करू शकता. बाकीचे साहित्य ताजेच असायला पाहिजे.
5. देवघरात या गोष्टी वर्जित आहे  
घरातील ज्या जागेवर मंदिर आहे तेथे चामड्याने बनलेल्या वस्तू, जोडे चपला घेऊन जाणे वर्जित आहे. मंदिरात मृतक आणि पूर्वजांचे चित्र कधीच लावायचे नसतात. पूर्वजांचे चित्र लावण्यासाठी दक्षिण दिशा श्रेष्ठ असते. घरात दक्षिण दिशेच्या भिंतींवर मृतकांचे फोटो लावू शकता, पण त्यांना मंदिरात ठेवणे वर्जित आहे. देव घरात पूजेशी निगडित साहित्यच ठेवायला पाहिजे तेथे इतर साहित्य ठेवणे टाळावे.  
 
6. देवघराच्या जवळ शौचालय नको  
घरातील देवघराच्या जवळ शौचालय असणे अशुभ असतं.  म्हणून अशा जागेवर देवघर असायला पाहिजे ज्याच्या जवळपास शौचालय नसेल. जर एखाद्या लहान खोलीत देवघर बनवले असेल तर तेथे थोडी जागा मोकळी असायला पाहिजे, जेथे तुम्ही आरामात बसू शकता.  
 
7. सर्व मुहूर्तांमध्ये करा गोमूत्राचा हा उपाय
वर्षभरात जेव्हा कधी श्रेष्ठ मुहूर्त येतात तेव्हा संपूर्ण घरात गोमूत्र शिंपडायला पाहिजे. गोमूत्र शिंपडल्याने पवित्रता बनून राहते आणि वातावरण सकारात्मक होऊन जातो. शास्त्रानुसार गोमूत्र फारच चमत्कारी असत आणि त्याच्या प्रयोगामुळे घरावर देवांची विशेष कृपा असते.