गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

चाणक्य नीती: जीवनात हे चार असतील तर मग कोणाचीही गरज नाही

आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतीमध्ये जीवनातील चार मित्रांबद्दल सांगितले आहे. हे मित्र सोबत असल्यास शेवटपर्यंत आपलं जीवन सुरळीत राहतं आणि त्यांची साथ शेवटपर्यंत राहते म्हणून त्यांचा सन्मान आणि काळजी घेणे देखील तेवढेच गरजेचे आहे. तर जाणून घ्या जीवनातील त्या चार मित्रांबद्दल
 
ज्ञान 
आचार्य चाणक्य यांनी म्हटले आहे की कोणत्याही व्यक्तीची सर्वात मोठी पुंजी त्याचं ज्ञान हे असतं. ज्ञानाच्या साहाय्याने प्रत्येक गोष्ट मिळवता येतीत. कठिण ते कठिण परिस्थतीतून बाहेर पडता येतं. सन्मान, धन, देखील ज्ञान असलेल्या व्यक्तीकडे आपोआप येतं. अर्थात शिक्षण हे मनुष्याचा सर्वात जवळचा मित्र आहे. घर, देश, काळ यापासून लांब असलं तरी ज्ञान नेहमी मनुष्याचे रक्षण करतं असतं. ज्ञानी व्यक्तीची ओळख आणि प्रशंसा जीवनकाळापर्यंत तर असतेच आणि मृत्यूनंतर देखील लोकं त्यांनी पसरवलेल्या ज्ञानाचा लाभ घेत असतात.
 
धर्म 
धर्म देखील मनुष्याच्या चांगल्या मित्रांपैकी एक आहे. जीवनात मार्ग न भटकता योग्या मार्गावर चालत राहण्यासाठी धर्माची गरज भासते. आणि धर्मानुसार जीवनात वागल्याने आपल्या चांगल्या कर्मांमुळे मृत्यूनंतर देखील योग्य मार्ग सापडतो.
 
गुणी साथीदार
गुणी जीवन साथीदारापेक्षा दुसरा चांगला मित्र या जगात कोणीच नाही. पत्नी गुणी असल्यास कुटुंब आणि समजात मान-सन्मानात वाढ होते. तसेच गुणी पती असल्यास कुटुंबाचे रक्षण आणि सर्व प्रकाराच्या संकटांना सामोरा जायची ताकद मिळते. गुणी साथीदारामुळे घराला घरपण येते आणि कुटुंबाला दोघांचा आधार असल्याने जीवन आनंदात घालवता येतं.
 
औषधी
औषधं देखील मनुष्याचे मित्र असतात. आजारी व्यक्तीला योग्य उपचार आणि औषधांमुळेच पुन्हा नवीन जीवन प्राप्ती होऊ शकते. औषध-उपचारामुळेच व्यक्ती पूर्ववत होऊन जीवनातील आपली भूमिका प्रामाणिकपणे निभावू शकतो..