testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

एकादशीचे महत्त्व जाणून घ्या

Last Updated: गुरूवार, 1 नोव्हेंबर 2018 (15:38 IST)
प्रत्येक चांद्रमासातील शुक्ल व कृष्ण पक्षातील ११ वी तिथीला एकादशी म्हटले जाते. एकादशीला हरिदिनी असेही म्हणतात. एकादशी विष्णूची तिथी मानलेली असून या दिवशी उपवास करतात. दुसर्‍या दिवशी त्याची पारणा करतात. एकादशीत स्मार्त आणि भागवत असे दोन भेद सांगितले आहे. ज्या पक्षात हे दोन भेद संभवतील, त्यावेळी पंचांगात पहिल्या दिवशी स्मार्त व दुसर्‍या दिवशी भागवत असे लिहिलेले असते.
प्रत्येक मासात दोन याप्रमाणे वर्षामध्ये २४ एकादश्या येतात, त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. चैत्रापासून फाल्गुन मासातील शुक्ल पक्षातील एकादशीची नावे – कामदा, मोहिनी, निर्जला, शयनी, पुत्रदा, परिवर्तिनी, पाशांकुशा, प्रबोधिनी, मोक्षदा, प्रजावर्धिनी, जयदा व आमलकी.

कृष्ण पक्षातील एकादशीची नावे अशी – पापमोचनी, वरुधिनी, अपरा, योगिनी, कामिका, अजा, इंदिरा, रमा, फलदा, सफला, षट्‌तिला व विजया. एकादशीचे नित्य व काम्य असे प्रकार सांगितले आहेत.

एकादशीच्या दिवशी ब्रह्महत्यादी सर्व पापे अन्नाचा आश्रय करून राहतात. म्हणून जो मनुष्य एकादशीच्या दिवशी अन्न भक्षण करतो त्याला ती पापे लागतात. म्हणून एकादशीला उपवास करण्यास सांगितले जाते. वर्षाच्या २४ एकादश्या नियमाने करणे व त्या दिवशी विष्णुपूजा, जागरण, हरिकथा श्रवण इ. गोष्टी करणे हे नित्य व्रत सांगितले आहे.यावर अधिक वाचा :

सामर्थ्यवान व श्रीमंत होण्यासाठी सूर्याला अर्घ्य द्या, ...

national news
पहाटे अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावे. शरीरावर चामड्याची काहीही परिधान केलेले नसावे. ...

गणपतीला प्रिय आहे हे फूल

national news
गणपतीला लाल रंगाचं फूल अधिक प्रिय आहे. म्हणूनच गणपतीची पूजा करताना लाल जास्वंदीची फुले ...

यामुळे देवपूजेत वापरतात तांब्याची भांडी

national news
हिंदू धर्मात देवाची आराधना करण्यासाठी अनेक नियम दिलेले आहेत. यातून एक म्हणजे पूजेसाठी ...

कौतुकाचा अर्थ होतो वेगळेपणा किंवा दुरावा

national news
जेव्हा एखादी चांगली व्यक्ती काहीतरी असामान्य करते तेव्हा तुम्ही त्यांचे कौतुक करता. ...

ह्या 7 गोष्टी तुमचे सर्वात मोठे शत्रू आहे, लगेचच त्यांना ...

national news
ग्रंथात अशा 7 गोष्टी आहे, जे मनुष्याचे सर्वात मोठे शत्रू म्हणून ओळखले जातात. ज्या ...

राशिभविष्य