गुरूवार, 28 मार्च 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: सोमवार, 25 जानेवारी 2021 (09:58 IST)

का करतात लक्ष्मी देवीसोबत श्रीगणेशाची पूजा

कोणतेही शुभ कार्य गणेश पूजन केल्याशिवाय सुरु केले जात नाही. गणपती बुद्धीचे देवता आहे. ते विघ्न विनाशक आणि विघ्नेश्वर आहे. जर व्यक्तीकडे खूप धन-संपत्ती आहे पण बुद्धीचा अभाव असेल तर ती व्यक्ती त्या पैशांचा सद्उपयोग करु शकत नाही. म्हणून व्यक्ती श्रीमंत असला तरी विवेक असणे गरजेचे आहे. तेव्हा धनाचे महत्तव समजता येऊ शकतं.
 
गणेश लक्ष्मी ची पूजा सोबत करण्यामागील महत्त्व दर्शवणार्‍या अनेक काहण्या आहे. अशीच एक कहाणी जाणून घ्या- 

शास्त्राप्रमाणे लक्ष्मी देवीला धन आणि समृद्धीचे प्रतीक मानले गेले आहे. यामुळे लक्ष्मीला याचा अभिमान होऊ लागतो. भगवान विष्णू हा अभिमान मोडू इच्छित होते म्हणून त्यांनी लक्ष्मी देवीला म्हटले की स्त्री तोपर्यंत संपूर्णता प्राप्त करत नाही जोपर्यंत ती आई होत नाही. देवी लक्ष्मी यांना संतान नव्हती आणि हे ऐकून त्या निराश झाल्या. तेव्हा त्या देवी पार्वतीकडे मदत मागण्यासाठी पोहचल्या. पार्वती देवींना दोन पुत्र होते म्हणून लक्ष्मी देवीने त्यांना एक पुत्र दत्तक द्यावा असे म्हटले. देवी पार्वती जाणत होत्या की लक्ष्मी एक जागी जास्त काळ राहू शकत नाही म्हणून त्या मुलाचे संगोपन करण्यात सक्षम नसणार पण त्यांचं दु:ख बघून त्यांनी आपला पुत्र गणेश लक्ष्मी देवीला सोपवला. याने देवी लक्ष्मी अत्यंत प्रसन्न झाल्या आणि म्हणाल्या की त्या गणेशाचं खूप लक्ष ठेवतील आणि सुख-समृद्धीसाठी मला पूजणार्‍या भक्तांना आधी गणेशाची पूजा करावी लागेल तेव्हाच माझी पूजा संपन्न होईल.