शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

महादेवाला चुकूनही हे फूल चढवू नाही

महादेवाला प्रसन्न करण्यासाठी आपण त्यांना भांग- धतुरा आणि अनेका प्रकाराचे फूल अर्पित करतो. शास्त्रांप्रमाणे महादेवाला पांढर्‍या रंगाचे फुल अतिप्रिय आहे, परंतु प्रत्येक पांढरा रंगाचे फूल त्यांना आवडतं असे नाही.
 
जर आपण कळत-नकळत हे फूल महादेवाला अर्पित करत असाल तर समजून घ्या की महादेव आपल्यावर प्रसन्न होण्याऐवजी नाराज होऊ शकतात. कारण शिव पुराणामध्ये एक विशेष फूल महादेवाला अर्पित करणे वर्जित मानले आहे. हे फूल चढवले तर देव प्रसन्न होण्याऐवजी रुष्ट होतात म्हणून चुकूनही हे पांढरं सुवासिक फुल महादेवाला अर्पित करू नये.
 
यासाठी अर्पित केलं जात नाही हे फूल: महादेवाला जे फूल अप्रिय आहे, त्याचे नाव आहे केतकी. महादेवाने या फुलाचा आपल्या पूजेत त्याग केला आहे. केतकीचा महादेवाने त्याग का केला याचे उत्तर शिव पुराणात आहे.
 
जाणून घ्या काय आहे यामागील कारण...

शिवपुराणाप्रमाणे एकदा ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात वाद निर्माण झाला की श्रेष्ठ कोण? यावर निर्णय घेण्यासाठी महादेवाला न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आले. महादेवाच्या मायेने एक ज्योतिर्लिंग प्रकट झाले. महादेवाने म्हटले की ब्रह्मा आणि विष्णू यांच्यातून जो कोणी ज्योतिर्लिंगाचे आदी-अंताचे शोध लावेल तो श्रेष्ठ. ब्रह्मा ज्योतिर्लिंग धरून आदीच्या शोधात खाली तर विष्णू ज्योतिर्लिंगाचे अंत शोधण्यासाठी वरच्या दिशेकडे निघाले. 
 
खूप अंतर पार केल्यानंतरही जेव्हा आदी-अंत शोधू शकले नाही तेव्हा ब्रह्माने बघितले की एक केतकी फूलही त्याच्यासोबत खाली येत आहे. ब्रह्माने केतकी फुलाला चुकीच्या मार्गाने खोटं बोलण्यासाठी तयार केले आणि महादेवाजवळ पोहचले.
 
ब्रह्माने म्हटले मला ज्योतिर्लिंगाची उत्पत्ती कुठून झाली हे समजले तरी विष्णूने अंत शोधू शकलो नाही असे सांगितले. ब्रह्माने आपली गोष्टीचा पुरावा म्हणून केतकीच्या फुलाला साक्ष द्याला सांगितली. परंतु महादेवाने ब्रह्माची खोटी वागणूक बघून त्यांचा शिरच्छेद केला. म्हणूनच पंचमुख असलेल्या ब्रह्माचे चार मुख राहिले. केतकीच्या फुलाने खोटी साक्ष दिली म्हणून महादेवाने ते फूल आपल्या पूजेतून वर्जित केले.