शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

मोहिनी एकादशी : या विधीने करा व्रत, जाणून घ्या महत्त्व व कथा

वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला मोहिनी एकादशी म्हणतात. धर्मशास्त्रानुसार, ही तिथी सर्व पापांना दूर करणारी आहे. या व्रताच्या प्रभावाने मनुष्याला मोह आणि पापांपासून मुक्ती मिळते. 
 
व्रत विधी
जो व्यक्ती मोहिनी एकादशीचे व्रत करत असेल त्याने अदल्या दिवशी अर्थात दशमी तिथीच्या रात्री व्रतच्या नियमांचे पालन केले पाहिजे. व्रताच्या दिवशी  एकादशी तिथीत व्रत करणार्‍याला सकाळी सूर्योदयाच्या आधी उठायला पाहिजे आणि स्नान आदी करून स्वच्छ वस्त्र धारण केले पाहिजे. या दिवशी विष्णूसोबत रामाची पूजा देखील केली जाते. व्रताचे संकल्प घेतल्यानंतरच व्रत करायला पाहिजे. संकल्प या दोन्ही देवांसमोर घ्यायला पाहिजे. देवाची पूजा करण्यासाठी कलश स्थापना करून त्यावर लाल रंगाचे वस्त्र बांधून सर्वप्रथम कलशाची पूजा केली पाहिजे.  
 
त्यानंतर यावर देवाची प्रतिमा ठेवावी व त्या प्रतिमेला स्नानादि करून शुद्ध करून उत्तम वस्त्र घालायला पाहिजे. नंतर धूप, दीपने आरती करून फळांचा प्रसाद दाखवायला पाहिजे. तो प्रसाद वितरित करून ब्राह्मणांना भोजन व दान दक्षिणा द्या. रात्री देवाचे कीर्तन करून मूर्तीच्या समीप झोपायला पाहिजे.  
 
अशी आहे मोहिनी एकादशी व्रताची कथा
सरस्वती नदीच्या काठी भद्रावती नावाचे नगर होते. तेथे धृतिमान नावाचा राजा राज्य करत होता. त्या नगरात एक बनिया राहत होता, त्याचे नाव धनपाल होते. तो विष्णूचा परम भक्त होता आणि नेहमी पुण्यकर्मात व्यस्त राहत होता. त्याचे पाच पुत्र होते - सुमना, द्युतिमान, मेधावी, सुकृत तथा धृष्टबुद्धि. धृष्टबुद्धि सदा पाप कर्मात लिप्त राहत होता. अन्यायाच्या मार्गावर चालून त्याने आपल्या वडिलांचे सर्व धन बरबाद केले होते.  
 
एका दिवशी त्याच्या वडिलांनी त्रस्त होऊन त्याला घराबाहेर काढले आणि तो दर दर फिरू लागला. फिरता फिरता तो महर्षी कौंडिन्यच्या आश्रमात पोहोचला आणि हात जोडून म्हणाला की माझ्यावर कृपा करून असे एखादे व्रत सांगा, ज्याच्या पुण्य प्रभावाने माला मुक्ती मिळेल. तेव्हा महर्षी कौंडिन्यने त्याला  वैशाख शुक्ल पक्षाची मोहिनी एकादशीबद्दल सांगितले. मोहिनी एकादशीच्या महत्त्वाला ऐकून धृष्टबुद्धिने विधिपूर्वक मोहिनी एकादशीचे व्रत केले. या व्रतामुळे तो निष्पाप झाला आणि दिव्य देह धारण करून गरूडावर बसून श्री विष्णुधामाला गेला. या प्रकारे हे मोहिनी एकादशीचे व्रत फारच उत्तम आहे. धर्म शास्त्रानुसार याचे पठण केल्याने सहस्र गोदानाचे फळ मिळतात.