गुरूवार, 28 मार्च 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By वेबदुनिया|

रथसप्तमी

रथसप्तमीच्या दिवशी सकाळी तुळशीवृंदावनाजवळ रांगोळी काढून त्यावर एक पाट ठेवतात. त्या पाटावर तांबड्या चंदनाने सात घोड्यांचा रथ काढून त्या रथांत सारथ्यासह सूर्याची प्रतिमा काढतात.

नंतर तांबडे गंध, तांबडी फुलें वगैरे पूजेचे साहित्य घेऊन पूजा करतात. सूर्याला नैवेद्याकरिता खीर करतात. या दिवशीं मातीच्या भांड्यांत दूध घालून ते भांडे अंगणांत गोवर्‍या पेटवून त्याच्यावर दूध उतास जाईपर्यंत ठेवतात.