मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 मे 2020 (10:14 IST)

काय सांगता रावणाच्या पायथ्याशी चक्क शनिदेव

लंकापती रावण एक क्रूर राक्षस होता. तो फक्त देवानंच नव्हे तर संपूर्ण नवग्रहांना देखील त्रास देत असे. त्यांनी नवग्रहांना आपल्या मुठीत ठेवले होते. त्या नवग्रहांना त्याने आपल्या लंकेत डांबून ठेवले होते. 
 
रावणाला ज्योतिषविद्या माहीत असे. रावण ज्योतिष विद्येमध्ये पारंगत असे. ज्यावेळी मेघनादचा जन्म होणार होता त्यावेळी रावणाने सर्व ग्रहांना अश्या घरात डांबून ठेवले की त्यांचा होणार मुलगा अजेय, अमर होईल. 
 
तेव्हा शनी देवाने एक युक्ती केली. त्यांनी मेघनादच्या जन्माच्या आधीच आपले घर बदलून घेतले जेणे करून मेघनाद अमरत्वला प्राप्त होऊ शकला नाही. रावणाला हे समजलं आणि त्याने चिडून शनीच्या पायावर आपल्या गदेने प्रहार केला. एवढ्याने रावणाचा राग शांत झाला नाही तर शनिदेवाची आपल्या राज्यावर वक्रदृष्टी पडू नये तसेच शनिदेवाच्या अपमान करण्याच्या दृष्टीने त्यांनी शनिदेवांचं तोंड खाली जमिनीकडे करून त्यांना आपल्या सिंहासनाच्या खाली पालथे टाकून दिले. 
 
सिंहासनावर बसताना आपले पाय ठेवण्यासाठी ते पालथे पडलेले शनिदेवांचा वापर करत असे. सिंहासनावर उठताना आणि बसताना शनिदेवाच्या अंगावर पाय देऊन त्यांना दाबत असे. 
 
काळानंतर सीतेचा शोध घेण्यासाठी मारुती लंकेत आल्यावर त्यांनी त्या सर्व नऊ ग्रहांना रावणाच्या कैदेतून मुक्त केलं. लंकेच्या बाहेर पडताना मात्र शनिदेवाने आपली वक्रदृष्टी लंकेवर टाकली आणि त्यांचा परिणाम असा झाला की रावणाची सोन्याची लंका जळून खाक झाली. 
 
हनुमानाने शनिदेवांना रावणाचा कैदेतून मुक्त केल्यामुळे हनुमानांवर प्रसन्न होऊन शनिदेवाने मारुतीच्या भक्तांना देखील आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरा जावं लागणार नाही असा आशीर्वाद दिला आहे.