शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

वसंत पंचमीला अमलात आणा हे 5 सोपे उपाय

देवी सरस्वतीच्या कृपेने विद्या, बुद्धी, वाणी आणि ज्ञानाची प्राप्ती होते. देवीची उत्पत्ती सत्वगुणाने झाली आहे. पांढर्‍या रंगाच्या वस्तू देवीला अती प्रिय आहे, जसे श्वेत पुष्प, श्वेत चंदन, दूध, दही, माखन, श्वेत वस्त्र, श्वेत तिळाचे लाडू.
 
प्राचीन काळात मुलांना या दिवसापासून शिक्षण देणे आरंभ केले जात होते आणि आजही ही परंपरा जिवंत आहे. म्हणूनच जाणून घ्या या दिवशीचे विद्यार्थ्यांसाठी अचूक उपाय:
1. विद्यार्थ्यांनी आपल्या कठिण पाठ्यपुस्तकांमध्ये वसंत पंचमीच्या दिवशी मोर पंख ठेवले पाहिजे.

2. वाक् सिद्धीसाठी दररोज आपली जीभ टाळूला लावून सरस्वतीचे बीज मंत्र ऐं हा जप करणे फायदेशीर ठरेल.

3. ज्यांच्या वाणीत तोतरेपणा असेल, त्यांनी या दिवशी बासरीच्या भोकांमध्ये मध भरून ते मेणाने बंद करून जमिनीत गाडावे. फायदा होईल.

4. मुलांना कुशाग्र बुद्धीसाठी या दिवशी ब्रह्मी, मेघावटी, शंखपुष्पी देणे आरंभ करावे.

5. सरस्वतीची कृपेसाठी सकाळी उठून तळहाताच्या मध्य भागाचे दर्शन करावे.