शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: सोमवार, 10 जुलै 2017 (17:40 IST)

शास्त्राप्रमाणे या धातूंच्या भांड्यात भोजन करण्याचे फायदे जाणून घ्या

जर तुम्ही एखाद्या शास्त्रात किंवा वेदात वाचाल तर कळेल की प्राचीन काळात सर्व लोक सोने, चांदी आणि मातीच्या भांड्यात का जेवण करत होते. पण वेळेनुसार आजकाल स्वयंपाकघरात जास्त करून ऍल्यूमिनियमाचे किंवा प्लास्टिकचे भांडे बघण्यात येतात. या भांड्यांमध्ये भोजन करणे ना तर आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे बलकी शास्त्रांमध्ये देखील याला योग्य नाही मानण्यात आले आहे. जाणून घ्या शास्त्रानुसार कोणत्या भांड्यात भोजन करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते....
1. लोखंडाचे भांडे 
आयुर्वेदानुसार, लोखंडाच्या भांड्यात भोजन केल्याने शरीरात कुठल्याही प्रकारचे हानिकारक प्रभाव पडत नाही. तसेच, यामुळे शरीरात लोह तत्त्वाची मात्रा वाढते, हिमोग्लोबिनचा स्तर योग्य राहतो व पचन संबंधित तक्रार नाहीशी होते. घरात शांती राहते आणि कामात यश मिळतो.   
2. कांस्य आणि पितळ भांडी
जर पितळाच्या भांड्यात जेवण तयार होत असेल तर त्यात 97 % पोषक तत्त्व विद्यमान असतात. पितळाच्या भांड्यात तयार भोजनात 92 % पोषक तत्त्व कायम राहतात. आयुर्वेदानुसार, कासेच्या भांड्यात भोजन केल्याने मस्तिष्क तेज होत आणि भूक देखील वाढते तसेच या भांड्यांमध्ये भोजन केल्याने रक्त पित्त ठीक होतो. पितळाचे नक्षीदार व सुंदर भांड्यांचा वापर करणे व या भांड्यांमध्ये विष्णूला प्रसाद दाखवल्याने घरात नेहमी बरकत राहते.  
3. सोने चांदीचे भांडे 
जर कोणी अधिक महागडे भांडे विकत घेऊ शकतात तर चांदीच्या भांड्यामध्ये भोजन करणे फारच फायदेशीर असत. चांदीची तासीर थंड असते. म्हणून चांदीच्या भांड्यांमध्ये भोजन केल्याने शरीरातील दाह शांत होते आणि डोळे स्वस्थ राहतात. जेव्हा की सोन्याच्या भांड्यांमध्ये जेवण केल्यानं शरीर मजबूत आणि ताकतवर होत. पुरुषांसाठी सोन्याच्या भांड्यांमध्ये जेवण करणे फारच लाभदायक मानले गेले आहे.  
  
4. मातीचे भांडे   
मातीच्या भांड्यात वरण 25 मिनिटाच्या आत हळू आचेवर शिजून जात. म्हणून वरणाला नेहमी मातीच्या भांड्यात शिजवायला ठेवून तुम्ही तुमचे बाकीचे काम करू शकता. एक वेळा मातीच्या भांड्यातील शिजलेले वरण जर तुम्ही खाल्ले तर ते एवढे  स्वादिष्ट आणि पौष्टिक असत की तुम्ही त्याची चव विसरू शकत नाही. याच प्रमाणे मातीच्या तव्यावर बनलेली पोळी व माठाचे पाणी फक्त स्वादिष्टच नसत तर ते जन्मभर तुम्हाला निरोगी बनवत.