गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: सोमवार, 9 मे 2016 (12:28 IST)

अक्षय तृतीयाच्या 4 दुर्लभ महासंयोग, जाणून घ्या कसे असतील ...

आज 9 मे रोजी अक्षय तृतीया आहे आणि याच दिवशी 4 दुर्लभ संयोग देखील बनत आहे. या तिथीवर 46 वर्षांनंतर एकत्र चार संयोग बनत आहे. अक्षय तृतीयाच्या दिवशी बुधाचा पारगमन होणार आहे. या पारागमन दरम्यान तीन इतर योग देखील बनत आहे.  
 
वर्ष 1970 मध्ये देखील 9 मे रोजी झालेल्या या संयोगांची स्थिती आजच्या दिवशी देखील बनली आहे. बुध आणि सूर्य पत्रिकेत एकत्र  असल्यास त्याला बुधादित्य योग म्हणतो. यंदा बुधाचा पारागमन वृषभ राशित होत आहे. म्हणून वृषभ राशिच्या जातकांसाठी विशेष फलदायी आहे.  
 
बुध, शुक्राच्या युतीमुळे दुर्लभ संयोग बनत आहे : अक्षय तृतीयाच्या दिवशी मेष राशित उच्चाच्या सूर्यासोबत बुध आणि शुक्राची देखील युती बनत आहे. ही युती सूर्योदयापासून पुढचा दिवस अर्थात 10 मे रोजी सकाळी 4 वाजून 13 मिनटापर्यंत राहणार आहे. या योगामुळे ज्या जातकांच्या पत्रिकेत चांडाल योग असेल त्यांचा त्रास थोडा कमी होणार आहे.   
 
वक्री असलेले गुरु देखील या दिवशी सायंकाळी 5 वाजून 44 वाजता मार्गी (सरळ) होतील. यामुळे चांडाल योग असणार्‍या जातकांना आराम मिळेल. या दिवशी मृगशिरा नक्षत्रात अमृत कुंभ योग देखील बनत आहे. 12 वर्षानंतर येणार्‍या या योगात उच्चचा सूर्य मेष राशित,   सोमवाराचा दिवस आणि सर्वार्थ सिद्घि योग आहे. हा सुख-समृद्धिचा देखील कारक आहे.  
 
काय आहे पारागमन : जेव्हा बुध ग्रह सूर्य आणि पृथ्वीच्या मधून जातो तसेच सूर्य, पृथ्वी आणि बुध एका रेशेत येतात. तेव्हा सौरमंडळात  बुध ग्रह सूर्यावर एका काळ्या डागासारखा (बिम्ब) जाताना दिसतो.