बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: मंगळवार, 14 एप्रिल 2015 (10:39 IST)

आज दुपारपासून पंचक, 18च्या संध्याकाळपर्यंत लक्षात ठेवा या गोष्टी

हिंदू धर्मात कुठले ही शुभ कार्य करण्याअगोदर शुभ-अशुभ मुहूर्ताबद्दल विचार करण्यात येतो. ज्योतिषानुसार काही नक्षत्र स्वयंसिद्ध असतात अर्थात या नक्षत्रांमध्ये शुभ कार्य करणे फारच उत्तम असते, तसेच काही नक्षत्रांमध्ये बरेच कामं करणे निषेध असतात. धनिष्ठा, शतभिषा, पूर्वा भाद्रपद, उत्तरा भाद्रपद आणि रेवती हे अश्या नक्षत्रांचा एक समूह आहे. या 5 नक्षत्रांच्या समूहाला पंचक म्हणतात. यंदा पंचकाची सुरुवात 14 एप्रिल, मंगळवारी दिवसा 12.33पासून सुरू होत आहे, जे 18 एप्रिल, शनिवारी संध्याकाळ 05.20पर्यंत राहणार आहे. भारतीय ज्योतिषात पंचक हा काळ अशुभ मानला जातो. म्हणून या दरम्यान काही विशेष कामं करणे टाळायला पाहिजे. 

पुढे पाहा नक्षत्रांचा प्रभाव आणि पंचकाच्या दरम्यान कोणते 5 काम करणे निषेध आहे -
 
1. पंचकात जेव्हा घनिष्ठा नक्षत्र असेल तेव्हा गवत, लाकूड इत्यादी इंधन एकत्रित नाही करायला पाहिजे, याने अग्नीची भिती असते.  
2. पंचकाच्या दरम्यान दक्षिण दिशेत प्रवास करणे टाळावे, कारण दक्षिण दिशा, यमाची दिशा असते. या नक्षत्रांमध्ये प्रवास करणे धोकादायक ठरू शकते.  
3. पंचकात जेव्हा रेवती नक्षत्र सुरू असेल त्या वेळेस घराची छत नाही टाकायला पाहिजे, असे विद्वानांचे मत आहे. यामुळे धन हानी आणि  घरात क्लेश होतो.  
4. पंचकात पलंग तयार करणे देखील अशुभ मानले जाते. विद्वानांनुसार असे केल्याने फार मोठ्या संकट समोर येण्याची शक्यता आहे.  
5. पंचकात शवाचे अंतिम संस्कार करण्याअगोदर एखाद्या योग्य ब्राह्मणाचा सल्ला घ्यायला पाहिजे. जर असे नाही केले तर शवासोबत पाच पुतळे कणकेचे किंवा कुश (एक प्रकारचे गवत)ने बनवून अर्थीवर ठेवायला पाहिजे आणि या पाचींचे शवाप्रमाणे पूर्ण विधीने अंतिम संस्कार करायला पाहिजे, तेव्हा पंचक दोष समाप्त होतो. असे गरूड पुराणात लिहिले आहे.