शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

आज धनत्रयोदशी; घरोघरी दीपपूजनाची तयारी

हिंदू धर्मातील प्रमुख सणांपेकी एक असलेल्या दिवाळी सणाचा पहिला दिवस म्हणून ओळखल्या जाणार्‍या धनत्रयोदशीने आज दिवाळीपर्वाला प्रारंभ होत आहे. त्यासाठी धार्मिक परंपरेनुसार घरोघरी पूजेची तयारी करण्यात आली आहे. अश्‍विन महिन्याच्या तेराव्या दिवशी धनत्रयोदशी साजरी केली जाते. या दिवशी लक्ष्मीमातेची पूजाअर्चा करून तिला प्रसन्न करून घेण्यासाठी योग्य मुहूर्त असल्याचे मानले जाते.

या दिवसामागे काही दंतकथा सांगितल्या जातात त्यौेकी एक म्हणजे या दिवशी कथित भविष्यवाणीनुसार हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मुत्यूमुखी पडणार होता. आपल्या मुलाने जीवनातील सर्व सुख उपभोगावे म्हणून राजा, राणी त्यांचे लग्न करून देतात. लग्नानंतर चौथा दिवस त्यांचा मुत्यूमुखी पडण्याचा दिवस असतो. या दिवशी रात्रभर त्यांची पत्नी त्याला झोपू देत नाही. तसेच त्यांच्या अवतीभोवती सोन्या-चांदीच्या मोहरा ठेवते. सर्व महालात लखलखीत प्रकाश केला जातो. त्यावेळी यमराज त्याच्या खोलीत सर्प रूपाने प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो. मात्र सोने-चांदी, मोहरांनी त्यांचे डोळे दिपून जाऊन तो माघारी फिरतो आणि राजाच्या मुलांला जीवदान मिळते. म्हणून या दिवसाला यमदीपदान असे म्हटले जाते. या दिवशी घराबाहेर दिवा लावून वातीचे टोक दक्षिण दिशेस केले जाते. त्यामुळे घरात येणारा अपमृत्यू टळतो, अशी धार्मिक धारणा आहे.

या दिवसाने दिवाळीला प्रारंभ होऊन पुढील ५ दिवस दिवाळी चालते. या शिवाय समुद्र मंथनातून धन्वंतरी या दिवशी अमृतकुंभ घेऊन बाहेर येते, म्हणून या दिवशी धन्वतंरीची देखील पूजा केली जाते.