शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

कर्णाच्या पाच चुका आणि त्याचा मृत्यू...

या गोष्टीला आपण नाकारू शकत नाही की महाभारतातील प्रसिद्ध योद्धा आणि शेवटच्या दिवसांमध्ये कौरव सेनेचा सेनापती कर्ण आपल्या  प्रतिद्वंदी अर्जुनपेक्षा श्रेष्ठ धनुर्धर होता ज्याची प्रशंसा कृष्णाने देखील आहे. पण म्हणतात ना कुसंगतीचा प्रभाव फारच घातक ठरतो. फारचकमी लोक कमळा सारखे असतात. या कुसंगतीमुळेच कर्णाने बर्‍याच वेळ चुका केल्या होत्या. त्याच्या चुकांमुळे कौरव आणि पांडवांच्यायुद्धात त्याला कमजोर बनवून दिले होते.  

महाभारतात कर्ण सर्वात जास्त शक्तिशाली योद्धा होता. कर्णाला कशा प्रकारे काबूत ठेवायला पाहिजे, हे कृष्णासाठी देखील चिंतेचा विषय होता. पण कर्ण दानवीर, नैतिक आणि संयमशील व्यक्ती होता. ह्या तिन्ही गोष्टी त्याच्या विपरीत पडल्या पण कशा प्रकारे?

कर्णाबद्दल सर्वांनाच माहीत आहे की सूर्य-कुंती पुत्र होता. त्याचे पालक आई वडिलांचे नाव अधिरथ आणि राधा होते. त्याचे गुरु परशुराम आणि मित्र दुर्योधन होते. हस्तिनापुरामध्ये कर्णाचे पालन झाले. त्याने अंगदेशच्या राजसिंहासनचा कार्यभार सांभाळला होता. जरासंधाचा पराजय केल्यानंतर त्याला चंपा नगरीचा राजा बनवण्यात आले होते.  
पुढील पानावर पहिली चूक ...

ब्रह्मास्त्र : त्या काळात द्रोणाचार्य, परशुराम आणि वेदव्यास यांना ब्रह्मास्त्र चालवायचे आणि कुणाद्वारे ब्रह्मास्त्राचा प्रयोग केल्यानंतर त्याला  अपयशी करून देणे लक्षात होते. त्यांनी ही विद्या आपल्या काही खास शिष्यांना प्रदान केली होती. त्यातूनही कशा प्रकारे ब्रह्मास्त्राला अपयशी करणे, हे फारच कमी शिष्यांना लक्षात होते.   

द्रोणाचार्यांनी कर्णाला शिकवण्यास नकार दिल्यानंतर त्याने त्यांचे गुरू असलेल्या परशुरामांकडून ब्रह्मास्त्र मिळवले. परशुराम केवळ ब्राह्मणांनाच शस्त्रास्त्रविद्या शिकवत असल्याने कर्णाने असत्य बोलून त्यांच्या आश्रमात प्रवेश मिळवला, आणि ब्रह्मास्त्राची प्राप्ती करून घेतली.

परंतु त्यानंतर एकदा परशुराम त्याच्या मांडीवर डोके ठेवून झोपले असताना, एका भुंगा किड्याने त्याची मांडी पोखरण्यास सुरुवात केली. गुरुंची झोपमोड होऊ नये म्हणून कर्णाने त्या वेदना सहन केल्या, परंतु रक्ताचा ओघळ लागून परशुराम जागे झाले. एक ब्राह्मण एवढ्या वेदना सहन करू शकत नाही, हे लक्षात येताच त्यांनी कर्णाचे खरे कूळ विचारले. क्रोधित परशुरामाने सत्य कळताच कर्णाला शाप दिला, की ऐन युद्धप्रसंगी त्याला ब्रह्मास्त्राचे स्मरण होणार नाही.

पण आता प्रश्न असा आहे की जर त्याने खोट बोलले नसते आणि खरं सांगितले असते तर परशुरामाने त्याला विद्या शिकवली असती? अजिबात शिकवली असती. तर तो कोणाकडून शिकला असता? तसं तर ही फारमोठी चूक होती पण आपण त्याला चूकही म्हणू शकत नाही.  
पुढील पानावर दुसरी चूक ...

कवच आणि कुंडल : कृष्णाला हे ठाऊक होते की जो पर्यंत कर्णाजवळ त्याचे कवच कुंडल आहे, तो पर्यंत त्याला कोणी मारू शकत नाही.  अशाच अर्जुनच्या सुरक्षेची काहीही ग्यारंटी नाही. इकडे इंद्र चिंतित होते, कारण अर्जुन त्यांचा पुत्र होता.

कृष्ण आणि देवराज इंद्र दोघांना माहीत होते की जोपर्यंत कर्णाजवळ कवच आणि कुंडल आहे, तो युद्धात अजेय राहील. तेव्हा कृष्णाने देवराज इंद्राला एक उपाय सांगितला आणि मग देवराज इंद्र एका एका गरीब ब्राह्मणाचे रूप घेऊन कर्णाकडे त्याच्या कवच-कुंडलांचे दान मागितले. कवच-कुंडलांमुळे आपण युद्धात अजिंक्य आहोत, हे माहीत असूनही कर्णाने आपली कवच-कुंडले कापून इंद्राच्या स्वाधीन केली.

त्याच्या ह्या दानशूरपणावर प्रसन्न होऊन इंद्राने त्याचे रक्तबंबाळ रूप पूर्वीसारखे केले, आणि युद्धात एकदाच वापर करण्यासाठी एक शक्ती (वैजयंती अस्त्र) कर्णाला दिली.

कर्ण काही म्हणेल त्या आधीच देवराजाने ते वज्र शक्ती तेथे ठेवून तेथून धाव घेतली. कर्णच्या आवाज दिल्यानंतर देखील ते थांबले नाही. नंतर कर्णाला त्या वज्र शक्तीला स्वत:कडे ठेवावे लागले. पण जसे दुर्योधनाला हे कळले की कर्णाने आपले कवच-कुंडल दान केले आहे तर त्याला चक्करच आले. त्याला असे वाटू लागले की आता हस्तिनापुराचे राज्य त्याच्या हातून जात आहे. पण जेव्हा त्याने ऐकले की त्याबदले त्याला वज्र शक्ती मिळाली आहे तेव्हा त्याच्या जीवात जीव आला. 

आता याला तुम्ही कर्णाची चूक नाही म्हणू शकत. ही तर त्याची मजबूरी होती. पण त्याने इथे चूक ही केली की इंद्राकडून काही मागायला पाहिजे होते. नाही मागायची चूक तर चूकच असते. काही नाही तर, वज्र शक्तीचा वापर तीनवेळा करायची इच्छा दाखवली असती.
पुढील पानावर, तिसरी चूक...

सर्प आणि कर्ण : आता ही कथा किती सत्य आहे, त्याचा शोध घेणे गरजेचे आहे, कारण हे लोककथेवर आधारित आहे. असे मानले जाते की युद्ध दरम्यान कर्णाच्या तूणीरमध्ये एक फारच विषारी साप येऊन बसला होता. तूणीर अर्थात जेथे तीर ठेवतो. ही पाठीवर बांधलेली असते. कर्णाने जेव्हा एक तीर काढायचा प्रयत्न केला तेव्हा त्याच्या हातात तीराच्या जागेवर साप आला.  

कर्णाने विचारले, तू कोण आहे आणि येथे कसा आला. तेव्हा सर्प म्हणाला, हे दानवीर कर्ण मी अर्जुनाशी बदला घेण्यासाठी तुझ्या तूणीरमध्ये जाऊन बसलो होतो. कर्णाने विचारले, का? यावर सर्प म्हणाला, राजन! एक वेळा अर्जुनाने खांडवं वनात आग लावली होती. त्या आगीत माझी आई जळून मरण पावली, तेव्हापासून माझ्या मनात अर्जुनासाठी विद्रोह आहे. मी त्याच्या प्रतिशोध घेण्याचा मोका बघत होतो. आणि आज मला ती संधी मिळाली आहे. काही वेळ थांबून सर्प म्हणाला, तू मला तिरेच्या जागेवर चालून दे. मी सरळ अर्जुनला डसून घेईन आणि काहीच क्षणात त्याचा मृत्यू होईल.

सर्पाची गोष्ट ऐकून कर्ण सहजतेने म्हणाला की, हे सर्पराज तुम्ही हे चुकीचे कार्य करत आहात. जेव्हा अर्जुनाने खांडवं वनात आग लावली  होती तेव्हा त्याचा उद्देश्य तुझ्या आईला मारायचा नव्हता. अशात मी अर्जुनाला कसा दोषी मानू. दुसरे म्हणजे अनैतिकरीत्या विजय प्राप्त करणे माझ्या संस्कारांमध्ये नाही आहे म्हणून तू परत जा आणि अर्जुनला कुठलेही नुकसान पोहचवू नको. सर्प तेथून उडाला आणि कर्णाला आपले प्राण गमवावे लागले.  

पुढील पानावर, चवथी चूक ...

ब्राह्मणाचा शाप : परशुरामच्या आश्रमातून शिक्षा ग्रहण केल्यानंतर कर्ण वनात भटकत होता. या दरम्यान तो शब्दभेदी विद्या शिकत होता.  एक दिवस जेव्हा तो या विद्येचा अभ्यास करत होता तेव्हा एका गायीच्या वारसावर इतर पशू समजून शब्दभेदी बाण चालवतो आणि त्या बाणेमुळे तो वासरू मरण पावतो.  

तेव्हा त्या गाय-वासरूच्या स्वामी ब्राह्मणाने कर्णाला शाप दिला की ज्या प्रकारे तू एका असहाय वासरूला मारले, तसेच एक दिवस तू ही तेव्हा मरण पावशील जेव्हा तू स्वत:ला असहाय अनुभवशील कारण तेव्हा तुझे लक्ष्य आपल्या शत्रूपेक्षा एखाद्या दुसर्‍या कामात असेल. 

कर्ण आणि अर्जुनाची अखेरीस युध्धभूमीवर गाठ पडली. दोघेही तुल्यबळ योद्धे असल्याने त्यांचे युद्ध खूप वेळ चालले. परंतु, अखेरीस कर्णास ब्राह्मणाने दिलेल्या शापामुळे त्याच्या रथाचे चाक युध्धभूमीवर झालेल्या चिखलात अडकून बसले, आणि त्याचा रथ जागेवर अडकून पडला. चाक काढण्यासाठी धनुष्य खाली ठेवून कर्ण रथातून खाली उतरला. निःशस्त्र कर्णावर वार करण्यास अर्जुनाने नकार दिला, परंतु द्रौपदी-वस्त्रहरण आणि अभिमन्यूच्या मॄत्यूप्रसंगी कर्णाच्या सहभागाची कृष्णाने अर्जुनाला आठवण करून दिली, आणि कर्णावर हल्ला करण्यास सांगितले. स्वतःच्या रक्षणासाठी कर्णाने ब्रह्मास्त्राचे स्मरण करण्यास सुरुवात केली, परंतु परशुरामांच्या शापाप्रमाणे त्याला मंत्रांचे स्मरण झाले नाही, आणि अर्जुनाचा अंजलिक बाण त्याच्या कंठात घुसला.
शेवटची पाचवी चूक ...

कुंतीला दिलेले वचन : भीष्म शरशायी पडले असता, भेटायला आलेल्या कर्णाच्या शौर्याची स्तुती करून तिने कर्णाला त्याचे जन्मरहस्य सांगितले, आणि पांडवांच्या (व धर्माच्या) बाजूने लढण्याचा सल्ला दिला. परंतु कर्णाने परत एकदा मित्रकर्तव्याला जागण्याचे ठरविले.

तेव्हा कुंती म्हणाली की तू आपल्या भावांना मारशील का? तेव्हा तिच्या विनंतीला मान देऊन कर्णाने अर्जुन सोडून बाकी पांडवांना युद्धात न मारण्याचे तिला वचन दिले. कर्णाने त्यानंतर युद्धात अर्जुन सोडून सर्व पांडवांना गाठून त्यांचा पराभव केला, परंतु कुंतीला दिलेल्या वचनाला जागून त्याने सर्व पांडवांना जिवंत सोडून दिले.