बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By वेबदुनिया|

कार्तिकयाचे दर्शन स्त्रिया का घेत नाहीत ?

शंकर पार्वतीचे दोन मुले कार्तिकेय आणि गणपती यांना पृथ्वी प्रदक्षिणा घालण्यास सांगितल्यावरून कार्तिकेय मोरावर बसून पृथ्वी प्रदक्षिणा करण्यास निघून गेला. गणेशाने माता पिता यांची पूजा करून तीन प्रदक्षिणा दोघांना घातल्या व म्हणाला माझी पृथ्वीप्रदक्षिणा झाली.

गणपती सरस्वती यांचा विवाह समारंभ थाटामाटात झाला. कार्तिक याचा प्रवास चालू असतानाच गणेशाचा विवाह झालेला हे कार्तिकेयला समझले. माता पार्वतीने आपणास फसविले असा विचार त्याच्या डोक्यात आला. पार्वती स्त्रीच होती. स्त्रियांवरील कार्तिकेयाचा राग अनावर झाला त्याने शाप दिला, यापुढे जी स्त्री माझे मुख पा‍‍हिल, ती कायमची विधवा होईल. नंतर अरण्यात कायमचे वास्तव्य करण्यासाठी तो निघून गेला. आजन्म ब्रह्मचारी राहिला. वैधव्य येऊ नये म्हणून कार्तिकेयाचे दर्शन स्त्रिया घत नाहीत.

मुरलीधर वानखेडे