शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

खरा आधार देवाचा

थोर विचारवंत निक्षून कथन करतात की, हे विश्व नाशीवंत आहे. तला महत्त्व दिले की बंधने पडतात. म्हणून या असा संसारापासून दूर आणि आसक्त न होण्याची इच्छा झाली तरच ईश्वरप्राप्ती आहे. म्हणून माणसाने त्या देवाला जाणणे हीच उन्नती ठरते. 
 
धर्माचा संबंध भौतिकवादाशी नाही. ही गोष्ट आंतरिक संशोधनाची आहे. सुखाची पळवाट भटकणकरिता माणसाला प्रवृत्त करते. हा भ्रम लय  पावला की, खर्‍या दिशेने वाटचाल होते व ती खरी दिशा असते. संतांचा उपदेश आहे की, गृहस्थ बंधनात येत नाही पण गृहासक्ती बंधनात येते. अर्थात घरात वास करणे वाईट नसून घरातील पाणी, पदार्थ याबद्दल आसक्ती असणे अनिष्ट आहे. धनाचा अहंकार तथा दुरुपोग इष्ट नाही. म्हणून देवच माझे आहेत आणि मी त्यांचा आहे, हाच भाव ठेवून कार्य केले जावे. कारण देवाबद्दल आपलेपण हे सुगम व श्रेष्ठ साधन आहे. कोणत्याही तर्‍हेने भगवंताशी नाते जुळावे तेव्हा भगवंत स्वत:हून सर्व सांभाळून घेतात. देव हट्ट करून मिळत नाही तर खर्‍या प्रेमाने वश होतात. म्हणून रात्रंदिवस त्यांचा ध्यास असावा. ईश्वराचे रूप, गुण आणि नाम सदैव जपत गेल्यास विश्वातील कष्ट व दु:खाने त्रास होणार नाही.
 
जेव्हा आम्ही आपल्याला समर्पण केले तेथे ‘मी’ ‘मी’ राहात नाही. ‘तुझे तुला अर्पण’मुळे देव आपल्या कुशलक्षेमाची हमी घेतात. हा जीव परमात्मशी एकाकार होतो. अशी व्यक्ती सुख दु:खापासून निर्लिप्त होते. अष्टावक्र गीतेत नमूद केले आहे की, मुक्त पुरुष स्तुती झाली तर प्रसन्न होत नाही अथवा निंदित झाल्यास क्रुद्ध होत नाही. तो मृतूत उद्विग्न होत नाही अथवा जीवनात प्रमोदित होत नाही. म्हणून तन्मयतेने प्रभूचे नाव स्मरणात यावे. जेवढा वेळ धार्मिक साहित्यात, अध्यनात जाईल त्यातच जीवनाचे सार्थक आहे. भक्ती आणि समर्पण यामुळे जीवन चरित्र उज्ज्वल बनू शकते. असे महत्त्वाचे विचार गजानन पांडे यांनी हिंदीतून व्यक्त केलेले असून मनन करणजोगे आहेत. 
 
डॉ. भीमाशंकर देशपांडे