गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

गणपतीचे विविध नावं

तामिळनाडूत आजही गणपतीला ब्रह्मणस्पती म्हणतात.
नंदना - शंकराचा पुत्र असल्याने त्याचे नाव नंदना पडले. 
शंभवी - पार्वतीचे पुत्र असल्याने त्याचे नाव शंभवी पडले. 
विघ्नेश्वर शब्दाचा अर्थ सकल विघ्न वा बाधांचा अधिपती असा आहे.
विनायक- या शब्दाचा अर्थ म्हणजे विशिष्टरूपाने जो नायक (नेता) आहे 
धूम्रकेतु - द्बिभूज अथवा चतुर्भूज व धूम्रवर्णी अवतार. वाहन निळा घोडा.
रुद्रप्रिया - भगवान शिवचे प्रिय असल्यामुळे त्याचे नाव रुद्रप्रिया पडले. 
महोदर –महोदर शब्दांचा अर्थ अनुक्रमे महा म्हणजे मोठे उदर (पोट) असणारा. याचे मूषकवाहन आहे
गजानन – गजानन अवतार सांख्यब्रह्म धारक आहे. त्याला लोभासुर आणि मूषक वाहन असेही म्हटले आहे. 
गणपतीला काही ठिकाणी गृत्समद असेही म्हटले आहे. 'मदस्राव करणारा हत्ती' असा या शब्दाचा अर्थ. 
सकल बाधांचा एकच्छत्र अधिपती व नियंत्रक असल्यामुळे गणपतीस विघ्नाधिपती हे नाम प्राप्त झाले.