शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

चाणक्यप्रमाणे आपले दुर्दैव दर्शवतात या 3 गोष्टी

आचार्य चाणक्य यांनी तीन अश्या गोष्टी सांगितल्या आहे ज्या स्पष्ट करतात की आपले नशीब चांगले नाही.
 
वृद्धावस्थेत बायकोशी विरह  
वृद्धावस्थेत भावनात्मक आधाराची जास्त गरज असते. जर या अवस्थेत बायकोने साथ सोडली किंवा ती मुत्यूमुखी पडली तर चाणक्यप्रमाणे हे दुर्दैव आहे. ही नीती बायकांवरपण लागू होते. युवावस्थेत तर हसण्या-खेळण्यात वेळ निघून जातो पण म्हातारपणी एक खर्‍या साथीदाराची गरज असते. म्हणून म्हातारपणी बायकोचा विरह वाईट असतो.


 

निर्भरता
चाणक्य म्हणतात की जर आपल्याला कोणावर निर्भर राहावं लागलं तर ही गोष्ट कष्ट देणारी आहे. भाग्याच्या दृष्टीने ही गोष्ट वाईट आहे. जर एखादा व्यक्ती प्रत्येक गोष्टीसाठी निर्भर आहे तर त्याचे जीवन नरकासारखे आहे. 
कारण तो प्रत्येक परिस्थितीत पराधीन आहे. म्हणून चाणक्य म्हणतात की कोणावरही निर्भरता दुर्दैवाचे लक्षण आहे.


श्रम आपले फळ दुसर्‍याच्या पदरी
चाणक्य म्हणतात की जगात काही लोकं खूप लबाड असतात. असे लोकं दुसर्‍यांचे कामं किंवा त्यांनी कमावलेली संपत्ती आपलीच आहे असे दर्शवतात. ज्याने खरंच कामं केले आहे त्याला श्रेय न मिळता कोणी दुसरेच आपले कौतुक करवून घेतात. चाणक्यप्रमाणे असा व्यक्ती दुर्देवी असतो ज्याला आपल्या कामाचे फळ मिळत नाही.