गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : गुरूवार, 19 मे 2016 (13:11 IST)

जाणून घ्या कोणत्या देवी देवतांना किती प्रदक्षिणा घालायला पाहिजे?

प्रदक्षिणा पूजेचा खास अंग असतो. शास्त्रांमध्ये असे मानले गेले आहे की प्रदक्षिणा केल्याने पाप मिटतात. विज्ञानाच्या दृष्टीने बघितले तर शारीरिक ऊर्जेच्या विकासात प्रदक्षिणेचे विशेष महत्त्व आहे.  
 
देवाची मूर्ती आणि मंदिराची प्रदक्षिणा नेहमी उजव्या हाताने सुरू करावी कारण मुरत्यांमध्ये उपस्थित सकारात्मक ऊर्जा उत्तराहून दक्षिणेकडे प्रवाहित होते. कळत नकळत उलटी प्रदक्षिणा घातली तर आमच्या व्यक्तित्वाला नुकसान पोहोचतो. उजव्याचा अर्थ दक्षिणपण असतो म्हणून परिक्रमेला ‘प्रदक्षिणा’ देखील म्हणतात.  
शास्त्रानुसार वेग वेगळ्या देवी देवतांच्या प्रदक्षिणेची संख्या वेगळी वेगळी सांगण्यात आली आहे. येथे जाणून घेऊ कोणत्या देवी देवतांना   किती प्रदक्षिणा घालायला पाहिजे....
 
मारुतीची तीन प्रदक्षिणा घालायला पाहिजे.
शिवलिंगाची अर्धी प्रदक्षिणा घालायला पाहिजे. 
 
देवीच्या तीन प्रदक्षिणा घालायला पाहिजे. 
कृष्णाच्या चार प्रदक्षिणा घालायला पाहिजे. 
 
विष्णूच्या चार प्रदक्षिणा घालायला पाहिजे.
रामाची चार प्रदक्षिणा घालायला पाहिजे. 
 
गणपतीची तीन प्रदक्षिणा घालायला पाहिजे. 
 
काल भैरवाची तीन प्रदक्षिणा घालायला पाहिजे.