शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

जेवण्याची योग्य पद्धत...

जेवताना काही गोष्टींकडे लक्ष दिल्यास आरोग्य लाभ मिळत असून देवाची कृपादेखील प्राप्त केली जाऊ शकते. पूर्वीच्या लोकांप्रमाणे काही अश्या गोष्टी आहे ज्या जेवताना लक्षात ठेवायला हव्या:




अशाने वय वाढतं
जेवण्यापूर्वी पाच अंग म्हणजे दोन्ही हात, दोन्ही पाय आणि चेहरा स्वच्छ धुऊन घ्यावा. धुतलेल्या पायांमुळे शरीराचे तापमान नियंत्रित राहील आणि याने आमच्या पाचक प्रणालीची सर्व ऊर्जा जेवण पचविण्यात वापरली जाईल. पाय धुतल्याने शरीरातील अतिरिक्त गरमी दूर होते, ज्याने गॅस आणि अॅसिडिटीची तक्रार होत नाही. याने वयदेखील वाढतं.


दिशा ज्ञान असू द्या
पूर्वी किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून अन्न ग्रहण केले पाहिजे. याने भोजनाद्वारे मिळणारी ऊर्जा पूर्णपणे प्राप्त होते. दक्षिण दिशेकडे तोंड करून जेवण करणे अशुभ मानले आहे. पश्चिम दिशेकडे तोंड करून जेवल्याने आरोग्य बिघडतं.


असे जेवू नाही
बेडवर बसून किंवा ताटली हातात घेऊन जेवू नये. उभ्या उभ्या जेवणेही योग्य नाही. एखाद्या लाकडाच्या पाटावर ताट ठेवून जेवायला पाहिजे. खरकट्या किंवा फुटलेल्या भांड्यांमध्ये जेवू नये.


जेवण्यापूर्वी देवाचं नाव घ्या
जेवण्यापूर्वी देवी अन्नपूर्णा व इतर देवांचे स्मरण करावे. यासह देवाला प्रार्थना ही करावी की सर्व उपाशी लोकांना भोजन मिळू दे. कधीही वाढलेल्या अन्नाला नाव नाही ठेवू. याने अन्नाचा अपमान होतो.


स्वयंपाक करणार्‍यांनी हे लक्षात ठेवावे
अंघोळ करून स्वयंपाक करायला हवा. स्वयंपाक करताना मन शांत असावं. या दरम्यान कोणाबद्दलही वाईट विचार नसले पाहिजे.


जेवताना मन निर्मल असू द्या
जेवताना आमच्या मनात कोणाप्रती ईर्ष्या नसली पाहिजे. रागावून, मनात लोभ ठेवून किंवा भयभीत होऊन जेवू नये. याने अन्न पचत नसून हे आरोग्यासाठी नुकसानदायक ठरतं.