गुरूवार, 28 मार्च 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

तिजोरीचे चमत्कारिक टोटके, व्हाल मालामाल

तिजोरी दिशा कोणती असली पाहिजे आणि त्यात काय वस्तू ठेवल्याने बरकत येतं जे जाणून घ्या:
 
* तिजोरीत ठेवा पूजेची सुपारी: पूजेची सुपारी पूर्ण आणि अखंडित असते. म्हणूनच पूजा करताना सुपारीचं गणपतीचा रूपात पूजन केलं जातं. त्यावर जानवं अर्पित केलं जातं. नंतर हीच सुपारी तिजोरीत ठेवावी. कारण जिथे गणपती अर्थात बुद्धीचे स्वामी निवास करतात तिथे लक्ष्मी निवास करते. याने घरात लक्ष्मी स्थायी निवास करते.
लक्ष्मी पूजन करताना सुपारी ठेवून त्यावर लाल दोरा गुंडाळा. त्यावर अक्षता, कुंकू, फूल आणि इतर पूजन सामग्री चढवून पूजा झाल्यावर ही सुपारी तिजोरीत ठेवा.

तिजोरीत ठेवा या वस्तू: शुक्रवारी पिवळ्या कापडात 5 शिंपले आणि केसर, चांदीच्या नाण्यासोबत बांधून तिजोरीत किंवा धन ठेवत असलेल्या जागी ठेवून द्या. याबरोबर थोड्याश्या हळदीच्या गाठी ठेवून द्या.

नेहमी राहील बरकत: तिजोरीत 10-10 च्या नोटांची एक गड्डी ठेवा आणि काही पितळ आणि तांब्याचे नाणी ठेवून द्या. पिवळे नाणीही ठेवू शकतात. काही नाणी आपल्या खिशातही ठेवा. लक्षात ठेवा की नाणी जर्मन किंवा अॅल्युमिनियमचे नसावे.

पिंपळाचे पान: एक पिंपळाचे पान घ्या. साजुक तुपात लाल शेंदूर मिसळून त्यावर ॐ लिहून तिजोरीत ठेवून द्या. असे कमीत कमी पाच शनिवार करा. याने धन संबंधी अडचण दूर होईल.

पिवळे शिंपले: पुष्य नक्षत्राला संध्याकाळी लक्ष्मी पूजन करा. पूजेत चांदीचे नाणी, पैसे आणि शिंपले ठेवून केसर आणि हळदीने पूजन करावे. पूजा झाल्यावर हे तिजोरीत ठेवावे. तिजोरी नेहमी पेश्याने भरली राहील.

दक्षिणावर्ती शंख: तंत्र-मंत्र यात दक्षिणावर्ती शंखाचे विशेष महत्त्व आहे. हे पूजा स्थळ किंवा तिजोरीत ठेवल्याने रंकदेखील राजा बनून जातो. सोम-पुष्य योग मध्ये हे घरात ठेवल्याने सुख-समृद्धी राहील. हे शंख देवी लक्ष्मी ला आकर्षित करतं.

भोजपत्र: अखंडित भोजपत्रावर लाल चंदन पाण्यात घोळून घ्या आणि शाईप्रमाणे त्याच्या वापर करून मोर पंखावर 'श्रीं' लिहा. आता हे भोजपत्र तिजोरीत ठेवा.

बहेडाचे मूळ: बहेडा सहज मिळणारे फळ आहे. रवि-पुष्यच्या दिवशी याचे मूळ किंवा पाने आणून पूजा करावी. नंतर हे लाल कापडात बांधून तिजोरीत किंवा भांडारगृहात ठेवून द्यावे.

शंखपुष्पीचे मूळ: पुष्य-नक्षत्र च्या दिवशी शंखपुष्पीचे मूळ घेऊन, देवाच्या मूर्तीप्रमाणे पूजन करावे. नंतर याला चांदीच्या डबीत प्रतिष्ठित करून, ही डबी तिजोरी, भांडारघर किंवा धनाच्या पेटीत ठेवावी. याने लक्ष्मीची कृपा होते. प्रत्येक गुरु-पुष्यच्या दिवशी शंखपुष्पीचे मूळ आणि चांदीची डबी बदलून आधीची वाहत्या पाण्यात प्रवाहीत करून द्या.

 

यंत्र स्थापना: ऐश्वर्य वृद्धी यंत्र किंवा धनदा यंत्राची स्थापना करावी. दोघांमधून कोणत्याही एका यंत्राची विधिपूर्वक पूजा करावी. नंतर यंत्र तिजोरीत ठेवावे. याने आपली तिजोरीत कधीच रिकामी राहणार नाही.

काळी गुंजा: धन- संपदा वाढविण्यासाठी तिजोरीच्या खाली किंवा तिजोरीत काळी गुंजाचे अकरा दाणे ठेवावे. तिजोरीत नेहमी लाल रंगाचे कापड वापरावे. दुकानात तिजोरीजवळ गणपती आणि लक्ष्मीचे फोटो लावावे.

व्यवसायात लाभ हेतू: होळीच्या दिवशी गुलालच्या पॅकेटमध्ये एक मोती शंख आणि एक चांदीचे नाणं ठेवून त्याला लाल कापडात लाल दोर्‍याने बांधून तिजोरीत ठेवा.
किंवा एखाद्या शनिवारी निळ्या कापड्यात 21 रक्त गुंजाचे दाणे बांधून तिजोरीत ठेवा. आपल्या इष्टदेवाची आराधना करत दर रोज दिवा लावून धूप दाखवा. असे नियमित केल्याने व्यवसायात फायदा होईल.

श्रीफळ: एखाद्या शुभ मुहूर्तात लाल कापडात श्रीफळ ठेवून त्यावर कामिया शेंदूर, देशी कापूर आणि अख्खी लवंग चढवून धूप–दीप दाखवून काही दक्षिणा अर्पित करून आपल्या तिजोरीत ठेवावे. याने धनवृद्धी होते. 
जर एक नारळ चमकदार लाल कापडात गुंडाळून तिजोरीत ठेवल्यास शीघ्र धन लाभ होईल.