गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. »
  3. हिंदू
  4. »
  5. हिंदू धर्माविषयी
Written By वेबदुनिया|

तू नोकर नाही, मालक आहेस

ND
वंदन व हृदयभावना ह्यांचा संगम झाला की भक्ती पावते.

कर्दम ऋषी आणि देवहुतीयांच्या पोटी ज्ञानस्वरूप कपिल ऋषीने जन्म घेतला.कर्दम म्हणजे इंद्रियांवर नियंत्रण ठेवणारा जितेंद्रिय आत्मा इंद्रियांचा नोकर नाही, मालक आहे. मालकाने नोकरांना काबुत ठेवले पाहिजे. नाही तर सारी शिस्त बिघडते. कर्दम व्हायचे असेल तर इंद्रियांचा मोह सोडावा लागले. मागितलेल्या सार्‍या गोष्टी इंद्रियांना पुरविण्याची काही आवश्यकता नाही. संयमानेच जीवन ज्ञानमय होते. नाहीतर जीभ आणि डोळे बारा वाटा दाखवितील, मी फक्त भगवंताचा नोकर आहे असे इंद्रियांना वेळोवेळी सांगयलाच हवे. आपल्याला ज्ञान स्वरूप कपिल व्हायचे असेल तर सर्व इंद्रियांवर नियंत्रण ठेवावे. डोळे आणि मनाची शक्ती वाढवावी व सर्व वृत्तींना सत्कर्माकडे वळवा.

(श्रीमदभागवत या महान ग्रंथाचे सार सांगणाऱ्या परमपूज्य डोंगरे महाराजकृत भागवत प्रसादी या पुस्तकाचा भावानुवाद)
अनुवादकः सौ. कमल जोशी