गुरूवार, 28 मार्च 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: बुधवार, 7 जानेवारी 2015 (15:57 IST)

दिव्यध्वनी : वर्तमान

आज (वर्तमान) ही ईश्वराकडून मिळालेली देणगी आहे. म्हणूनच याला ‘प्रेझेन्ट’ (उपहार) म्हणतात. इथे तुमचमध्ये कितीजणांना कृतज्ञता वाटते? जर तुम्ही कृतज्ञ असाल तर तुम्ही माझे नाहीत!
 
तुम्हाला जर कुणी काही दिले आणि तुम्ही आभार मानलेत तर तुम्ही स्वत:ला त्यांच्याहून वेगळे समजता असा त्याचा अर्थ होतो. तुम्ही कधी स्वत:चे आभार मानता का? धन्यवाद देण्याचा अर्थ तुम्ही स्वत:ला गुरूचा अंश मानत नाही असा झाला. जोपर्यंत लहान मुले आपलेपणा बाळगतात तोपर्यंत त्यांना कृतज्ञ वाटत नाही. ते सगळ्या गोष्टींवर आपला हक्क मानतात. आपले समजतात. 
 
जेव्हा तुम्ही कृतज्ञ राहता, तुम्ही केंद्र बनता, तुम्ही स्वत:ला महत्त्वपूर्ण मानू लागता. तुम्ही एखादी सुंदर गोष्ट प्राप्त झाल्याबद्दल ईश्वराचे आभार मानता. जशी आपल्या डोळ्यांची दृष्टी. तेव्हा जास्त महत्त्वपूर्ण कोण ठरले? तुम्ही की ईश्वर? तुम्ही! याचा अर्थ तुमची कृतज्ञता अहंकाराचे दर्शन घडविते. 
 
श्री श्री रविशंकर 
 
(‘मौन एक उत्सव’ मधून साभार)