शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

देवघरात पाळा हे नियम

* देवघरात देवदेवतांच्या मूर्तीची तोंडे कधीही दक्षिणेकडे किंवा एकमेकांसमोर करू नये.

* देवघरात लावलेल्या समईची ज्योत दक्षिणेकडे असू नये. समईत नेहमी विषम वाती असाव्यात. तसेच निरंजन जाळतना तूप व तेल एकत्र घालू नये.

* एका घरात दोन शिवलिंगे, शाळिग्राम, सूर्यकांत, चक्रांक, गणपती व शंख पुजू नये. शाळिग्राम सम पुजावेत. मात्र दोन पुजू नयेत. विषमात एक पुजावयास हरकत नाही.

* पूजन करताना देवाला नेहमी करंगळी जवळच्या बोटाने अर्थातच अनामिकेने गंध लावावे.

* देवपूजा करताना आपणं वापरत असलेली आसन आणि जपमाळ कधीही दुसर्‍यांना वापरण्यासाठी देऊ नये.

* श्रीफळ चढविताना शेंडीचा भाग देवाकडे असावा.

* डोक्यावर टोपी लावून देवांना वंदन करू नये.

* पूजा झाल्यावर देवाला दोन्ही हात जोडून नमस्कार करावे. कधीही एका हाताने नमस्कार करू नये.