शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

देवाला नको धन अथवा पंचपक्वान्न! जाणून घ्या कशी करावी पूजा

कोणत्याही देवाला भक्ताकडून धन, वैभव किंवा पंचपक्वान्नाच्या नैवेद्याची गरज नसते, त्याला तर फक्त ओढ असते भक्तीची. भक्तीच्या भुकेला देवाला दोन हस्तक व तिसरं मस्तक एवढेच लागतं. म्हणून देवपूजेत अवडंबर नसावा. मग कशी करावी देवपूजा जाणून घ्या...

* मंत्राद्वारे देवपूजा केली पाहिजे पण ते मंत्र येत नसतील तर शक्य नसेल तर षोडशोपचारे पूजा करावी.
* देव्हार्‍यात भंग, जीर्ण मुरत्या किंवा फोटो ठेवू नये.
* पूजा करताना मनापासून श्रद्धा असावी. ज्याला यात रस नाही त्याने पूजा करणार्‍यांना अडवू नये. 
* शारीरिक स्वच्छता आणि शांत चित्त ठेवून देवपूजा करावी.

* देवाला स्नान घालून हळद, कुंकू, अक्षता, गुलाल, उदबत्ती, दीप, फूल, नैवेद्य यशाशक्ती अर्पण करावे.
दुसर्‍यांच्या बागेतील फुलं चोरून देवाला वाहू नये.
देवपूजा करताना मनात चिंता, ताण, कपटी विचार नसावे.
देवपूजेस वेळ नसल्यास वारंवार देवाचे नामस्मरण केले तरी पुण्य मिळते.
देवपूजा अगदीच जमत नसेल त्याने आपल्या माता-पिताची सेवा करावी.