शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By वेबदुनिया|

देवीची ओटी कशी भरावी?

देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी. सहावारी साडीपेक्षा नऊवारी साडी अर्पण करणे अधिक योग्य आहे.

ताटात साडी ठेवून साडीवर थोडे तांदूळ, खण व नारळ ठेवावा. नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी. हे सर्व साहित्य हातांच्या ओंजळीत घ्यावे आणि ओंजळ छातीसमोर धरून शरणागतभावाने देवीसमोर उभे राहावे. 'देवीकडून चैतन्य मिळू दे, तसेच आपली आध्यात्मिक उन्नती होऊ दे', अशी भावपूर्ण प्रार्थना करून ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण करावे. नंतर या साहित्यावर थोडे तांदूळ वाहावेत.