शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

पूजेतील कापराचे महत्त्व

हिंदुधर्मातील विविध कर्मकांडात वापरण्यात येणार्‍या गोष्टींमागे केवळ धार्मिकच नव्हे, तर वैज्ञानिक दृष्टीसुद्धा असते. प्राचीन काळापासून आपल्या देशातील धार्मिक विधींमध्ये कापराचा वापर करण्यात येत आहे. कापराचा सर्वाधिक वापर आरतीत करण्यात येतो. कापूर तीव्र ज्वलनशील वानस्पतिक द्रव्य आहे.
 
धार्मिक महत्त्व
 
आरतीमध्ये कापूर लावण्याची प्रथा प्राचीन काळापासून सुरू आहे. शास्त्रानुसार देवी-देवतांसमोर कापूर लावल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते. 
 
ज्या घरात नियमितपणे कापूर जाळला जातो, तेथे पितृदोष किंवा इतर प्रकारच्या दोषाचा प्रभाव राहत नाही. कापूर लावल्याने वातावरण पवित्र आणि सुगंधित होते. अशा वातावरणात देवता लवकर प्रसन्न होतात. कापराच्या प्रभावाने घरातील वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि याच्या सुगंधाने आपल्या विचारांमध्येही सकारात्मकता येते.
 
वैज्ञानिक महत्त्व
 
कापूर लावण्याचे वैज्ञानिक महत्त्वसुद्धा आहे. वैज्ञानिक संशोधनाने सिद्ध झाले आहे की, कापराच्या सुगंधाने जिवाणू, विषाणू आदी नष्ट होतात. यामुळे वातावरण शुद्ध होते. यामुळे आजार दूर राहतात. त्यामुळेच पूजा, आरती आणि धार्मिक विधींमध्ये कापराला विशेष महत्त्व आहे. रात्री झोपण्यापूर्वी कापूर जाळल्यास अनिद्रेची समस्या दूर होते, तसेच वाईट स्वप्न पडत नाहीत.