शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : मंगळवार, 16 जून 2015 (16:31 IST)

पैशांची कमतरता दूर करण्यासाठी तुपाचे हे प्रयोग नक्की करून बघा

प्राचीन मान्यता आहे की देवाला तूप अर्पित केल्याने आणि शिवलिंगाजवळ रात्रीच्या वेळेस तुपाचा दिवा लावल्याने स्वास्थ्य लाभासोबत पैशांची कमतरता दूर होते. हे उपाय नेमाने केले पाहिजे.  
 
येथे जाणून घ्या तुपाचे काही उपाय, या उपायांसाठी गायीच्या दुधाने तयार केलेल्या तुपाचा प्रयोग केला तर श्रेष्ठ ठरेल...
 
स्वास्थ्य लाभ प्राप्त करण्यासाठी तुपाचा उपाय
जर एखादा व्यक्ती बर्‍याच दिवसांपासून आजारी असेल आणि त्याचा आजार बरा होत नसेल, तर त्यासाठी तुपाचा हा उपाय केला पाहिजे.   ज्या खोलीत रोगी आराम करत असेल, त्या खोलीत रोज संध्याकाळी तुपात केसर घालून दिवा लावावा. तसेच रोग्याचे औषध, डॉक्टरचे परामर्श इत्यादीपण सुरू ठेवावे. दिवा लावल्यानंतर त्यातून तूप आणि केसर मिश्रित धूर निघेल, ज्याने वातावरणाची नकारात्मक ऊर्जेला दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो. ज्याने रोग्याला लवकर बरं वाटेल.
वैवाहिक जीवनात सुख-शांतीसाठी तुपाचा उपाय
आजकाल जास्तकरून लोकांच्या वैवाहिक जीवनात वाद-विवाद होतच राहतात. कधी कधी लहान लहान विवाद देखील मोठे रूप घेऊन घेतात. अशा स्थितीपासून बचाव करण्यासाठी तुपाचा उपाय करावा. रोज रात्री झोपण्या अगोदर घरात जेथे आम्ही भांडी घासतो, त्या जागेवर तुपाचा दिवा लावायला पाहिजे. दिवा लावण्याअगोदर ती जागा स्वच्छ करून घ्यावी. 
शारीरिक बल प्राप्त करण्यासाठी तुपाचा उपाय
जर कोणी व्यक्ती शारीरिक रूपेण कमजोर असेल तर त्याला रोज महादेवाला तूप अर्पित करायला पाहिजे. शिवपुराणानुसार, जो व्यक्ती शिवलिंगावर तूप अर्पित करतो त्याला शारीरिक बल प्राप्त होतो. या उपायासोबत, जेवण्यात तुपाचा वापर करायला पाहिजे. शारीरिक बल प्राप्त करण्यासाठी संयमित दिनचर्येचे पालन केले पाहिजे. खान-पानाकडे विशेष लक्ष्य द्यायला पाहिजे.
yagya
हवनात गायीच्या दुधापासून तयार दुधाचे महत्त्व
पूजा, हवन इत्यादी धार्मिक कार्यांमध्ये गायीच्या दुधापासून तयार तुपाचे विशेष महत्त्व आहे. हवन करताना या तुपाने आहुती दिल्याने किंवा तुपाचा दिवा लावल्याने जो धूर निघतो, तो वातावरणासाठी फायदेशीर ठरतो. या धुरामुळे वार्‍यात उपस्थित सूक्ष्म आणि हानिकारक कीटाणु नष्ट होतात. नकारात्मक ऊर्जा संपते आणि पवित्रता वाढते. हेच कारण आहे की मंदिरांमध्ये गायीच्या तुपाचा दिवा लावणे आणि  यज्ञ इत्यादींमध्ये या तुपाचा उपयोग करण्याची प्रथा सुरू आहे.