गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By सौ. कमल जोशी|

भोगाची बुभुक्षा सर्वात मोठे दु:ख आहे

प्रेमाने माणसाची उन्नती होते तर कामाने अधोगती 

सुख दु:ख  : सुख आणि दु:ख एक दुसर्‍याचे प्रतिबिंब आहे. सुखाचा शोध घेण्यार्‍याच्या घरी दु:ख न बोलाविता जाते, दुसर्‍याला सुख देण्याकरता स्वत:ची दु:खांत आहुती देणारी व्यक्ती जीवनाचे खरे सुख अनुभवते. विहिरीवर चालणार्‍या राहाटगाडग्या प्रमाणे सुख-दु:खाची ऊन सावली मानवी जीवनात येते आणि जाते.

म्हणूनच सांसारिक सुख दु:खाच्या मागे भटकण्या पेक्षा आन्तरिक सुखाच्या शोधात साधकाने राहावे त्यामुळेच खरी शान्ती प्राप्त करता येते प्रापंचिक सुख तर अशान्तीची आगच प्रज्वलित करते. खरे सुख मिळविण्यास बाहेर भटकणे व्यर्थ आहे. ते आंतरिक सुख आहे, ते अंतर्दष्टीने प्राप्त होते. आन्तरिक आनंदच शाश्वत आहे. बाहेरचा आनंद क्षणात दारूण दु:खात परिवर्तित होतो, सांसारिक विषय वासने मध्ये आनंद शोधणार्‍याचा अंत दु:खातच होतो. कारण त्यामागे भोगाची भूक असते. भोगाची बुभुक्षा सर्वात मोठे दु:ख आहे.

(डोंगरे  महाराजांच्या भागवती प्रसादीतून)
अनुवाद :  कमजोशी