गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By वेबदुनिया|

मराठीत नवीन उखाणे

झुळुझुळु वाहे वारा मंद मंद चाले होडी
आयुष्यभर सोबत राहो --- - --- ची जोडी 

पुण्यात औन्ध मधे बन्गला उभा आहे ऐटित
जलु नका लोकहो ... राव आहे आय़् टीत 

अत्रावळ पत्रावळ , पत्रावळीवर होती वान्ग्याची फोड 
***** हसतात गोड, पण डोळे वटारायची भारीच खोड् 

सखोल विचार आणि कठीण परीश्रमाला असावी प्रामाणिकपणाची जोड 
...चे बोलणे आहे साखरेपेक्षा गोड

वड्यात वडा बटाटावडा, 
... मारला खडा
म्हणून जमला आमचा जोडा.

भाजीत भाजी मेथीची,
......माझ्या प्रितीची.

सासर्याच्या मांडवात पंचपक्वांनाच्या राशी,
पोट्टे पाट्टे जेवुन गेले, जावई राहीला उपाशी.

दुधाचे केले दहि, दह्याचे केले ताक,
ताकाचा केला मठ्ठा, ...... चे नाव घेतो ..... रावान् चा पठ्ठा

WD
भाऊबहिणीच्या प्रेमाचे प्रतिक आहे रक्षाबंधन,
....ना करीते मी रोजच वंदन.

तडजोड हा मंत्र आहे दोन पिढ्यांना जोडणारा पूल
...ना आवडते गावठी गुलाबाचे फुल

पनिपुरि खाताना लागतो जोरदार थसका,
... ला आवडते बिस्कित ब्रितानिया मस्का - चस्का

हिरवा शालू लेवुनि येतो श्रावण महिना,
.... हाच माझा खरा दगिना.

श्रावण महिन्यात सर्वजण करतात श्रवणी सोमवार,
.... सह केले मी हरिद्वार किंवा आहेत दिलदार.
WD
झुळुझुळु वाहे वारा मंद मंद चाले होडी
आयुष्यभर सोबत राहो --- - --- ची जोडी

पुण्यात औन्ध मधे बन्गला उभा आहे ऐटित
जलु नका लोकहो ... राव आहे आय़् टीत

अत्रावळ पत्रावळ , पत्रावळीवर होती वान्ग्याची फोड
***** हसतात गोड, पण डोळे वटारायची भारीच खोड्

सखोल विचार आणि कठीण परीश्रमाला असावी प्रामाणिकपणाची जोड
...चे बोलणे आहे साखरेपेक्षा गोड