गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: मंगळवार, 14 जुलै 2015 (11:58 IST)

मानवतेचा संगम 'कुंभमेळा'

भारतीय संस्कृतीत कुंभमेळ्याचे खूप महत्त्व आहे. पुरणानुसार हा एकमात्र मेळावा, सण व उत्सव आहे की त्यात मानवतेचा संगम झालेला दिसतो. हिंदुबांधव एकत्र येऊन हा महोत्सव साजरा करतात. भारतीय संस्कृतीत ही परंपरा फार प्राचीन आहे. त्याचा उल्लेख आपल्याला पुराणात सापडतो. प्राचीन काळी ऋषीमुनी नदीकाठी एकत्र येऊन मोठे अध्‍यात्मिक कार्य करत असत तसेच एखाद्या रहस्यावर विचार विनीमय करत असत. आजही ही परंपरा कुंभमेळ्याच्या रूपाने सुरू आहे. संपूर्ण भारतातून लाखो भाविक गंगा नदीवर पवित्र स्नान करण्यासाठी हजेरी लावत असतात. गोदा नदीच्या तिरावर धर्मध्वजारोहणाने आज सिंहस्थ कुंभपर्वास आरंभ झाला असून सकाळी गुरू आणि रवी यांचा सिंह राशीत प्रवेश झाल्यानंतर नाशिकला वैष्णवांचा, तर त्र्यंबकेश्वरला शैव पंथियांचा मेळा भरला आहे.
 
कुंभमेळा आयोजनामागे वैज्ञानिक कारण असू शकते. कारण जेव्हा जेव्हा कुंभमेळ्याला सुरूवात होते. तेव्हा सूर्यामध्ये काही ना काही बदल होत असतो आणि त्याचा परिणाम पृथ्वीवर जाणवत असतो. प्रत्येक अकरा, बारा वर्षांच्या अंतराने सूर्यमध्ये परिवर्तन होत असते.
 
कुंभमेळा भारतातील सगळ्यात मोठा धार्मिक सोहळा आहे. भारतभरातून लोखो नागरिक कुंभमेळ्यात हजेरी लावतात व पवित्र गंगा नदीत स्नान करतात. इतक्या मोठ्या संख्येने हजयात्रेत मक्का येथे मुस्लीम बांधव एकत्र येत असतात. या दोन मोठ्या धार्मिक सोहळ्यात एकत्मतेचा व मानवतेचा संगम होत असतो.
 
प्रत्येक तीन वर्षांनंतर एक असे बारा वर्षांत चार वेगवेगळ्या तिर्थक्षेत्रावर चार कुंभमेळ्यांचे आयोचन होत असते. अर्धकुंभ मेळा प्रत्येक सहा वर्षांत हरिद्वार व प्रयाग येथे भरतो तर पूर्णकुंभ बारा-बारा वर्षांच्या अंतराने केवळ प्रयाग येथे भरत असतो. बारा पूर्ण कुंभमेळ्यानंतर महाकुंभमेळा तब्बल 144 वर्षांनंतर हरिद्वार (इलाहाबाद) येथे भरत असतो.