गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : शनिवार, 26 जुलै 2014 (16:13 IST)

या देवाला नैवेद्य भिंतीवरच्या घडय़ाळांचा

भारतात देवदेवतांची कमी नाही तसेच प्रत्येक देवदेवतांना भक्तांचीही काही उणीव नाही. भाषा वेगळ्या असल्या, प्रांत वेगळे असले तरी देवाबाबतची भावना प्रत्येक ठिकाणी सारखीच असते.

हिंदू धर्मात तर प्रत्येक देवासाठी खास नैवेद्यही असतो. म्हणजे गोपाळकृष्णाला साखर लोणी तर गणपतीबाप्पाला मोदक. देवीसाठी विविध खीरी, पुरणपोळी तर शंकराला दहीभात. देवाला नैवेद्य दाखवायचा आणि सुखी ठेव किंवा काही इच्छा पूर्ण कर अशी मागणी करायची अशी सर्वसाधारण पद्धत. उत्तरप्रदेशातील जौनपूर येथील ब्र्मह ब्रम्ह्बाबा मंदिरात मात्र नैवेद्य म्हणून भिंतीवरचे घडय़ाळ देण्याची प्रथा आहे.

त्यामुळे ब्रह्मबाबांचे नाव घडय़ाळबाबा असेही पडले आहे. गेली 30 वर्षे ही प्रथा सुरू असून मंदिराच्या भिंती, परिसरातील झाडे या भिंतींवर लावायच्या घडय़ाळांनी नुस्ती गजबजली आहेत. येथील एकही घडय़ाळ कधीही चोरीला जात नाही. असे सांगितले जाते की एका व्यक्तीला आपल्याला वाहन चालविता यावे अशी इच्छा होती म्हणून त्याने तसा नवस या देवाला बोलला. लवकरच तो ट्रक चालवायला शिकला आणि ट्रकचालक झाला. नवस फेडण्यासाठी त्याने भिंतीवर लावायचे घडय़ाळ विधिपूर्वक मंदिरात दिले आणि तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली. नवस कोणताही असला तरी तो फेडायला भिंतीवरचे घडय़ाळ देऊनच अशी परंपराच पडली असे समजते.