शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By वेबदुनिया|

वसंतोत्सव

मकर संक्रांतनंतर येणार्‍या माघ शुध्द पंचमीला वसंत पंचमी अर्थात निसर्गाचा उत्सव सर्वत्र साजरा केला जात असतो. वातावरणातील थंडी कमी होऊन वातावरण आल्हाददायक होते. निसर्ग सोळा कलांनी फुलून, बहरून येतो. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर भारतात व राजस्थानात हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. निसर्गाची सुंदरता आणि मानवाची रसिकता यांचा समन्वय भावमिलन व सुरेख संगम म्हणजे वसंत ऋतू होय.

वसंत पंचमीला नवीन पिकाच्या रास घरातल्या देवाला अर्पण करण्याची प्रथा आहे. त्यानंतर त्या नवीन पिकापासून भोजन तयार करून देवाला नैवेद्य दाखविला जातो. सरस्वतीची जननी म्हणून या दिवशी तिची पूजा करतात. यादिवशी लक्ष्मीचाही जन्मदिन भाविक मानतात. त्यामुळे या तिथीला काही ठिकाणी श्रीपंचमी या नावानेही साजरी केली जाते.

महाराष्ट्र व मध्यप्रदेश यांना वेगळा करण्यार्‍या सातपुडा पर्वता आदीवासी बांधव मोठ्या उत्सहात हा सण साजरा करीत असतात.