बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. सिंहस्थ 2016
Written By
Last Updated : शुक्रवार, 1 एप्रिल 2016 (13:06 IST)

शिवानीने स्मशानात केली तंत्र साधना (बघा फोटो)

उज्जैनमध्ये एप्रिल महिन्यात होणार्‍या सिंहस्थासाठी आतापासून साधूपासून संत आणि तांत्रिकांची भीड जमा होऊ लागली आहे. येथे एक अशी अघोरी तांत्रिक देखील पोहोचली आहे जी अमेरिकेहून पीएचडी केल्यानंतर भारतात येऊन स्मशान साधना करणारी अघोर तांत्रिक बनली. बघा शिवानीचे तंत्र साधना करतानाचे फोटो.... 
जेथे एकीकडे स्त्रिया स्मशानात जाण्याला घाबरतात तेथेच महाकालची नगरीत पोहोचलेली शिवानी दुर्गा बालपणापासूनच स्मशानात येत जात होती. तिची आजी स्मशानात जाऊन तिच्याकडून चितेला नमस्कार करवून घ्यायची. जवळपास ही क्रिया रोज केल्याने तिच्या मनातून स्मशानाची भिती जाऊ लागली आणि शिवानी त्यामुळे निडर बनली आणि तिच्यात आध्यात्मिक प्रवृत्तीने जन्म घेतला.  
 
शिवानी फक्त अघोर तंत्रच नव्हे तर पश्चिमी देशांच्या रहस्यमय तंत्र शास्त्र विक्का, वोडु, सोर्करीची देखील सिद्ध साधिका आहे. यात निपूणहोऊन तिने सर्व विधांच्या समानतेला जोडून नवीन पद्धती विकसित केली आहे.   
अघोर तंत्राचे नाव एकल्याबरोबर जेथे लोक घाबरतात तिथे शिवानीचे मानणे आहे की अघोरी तर सर्वच असतात, कारण अघोर शिवाचा रूप आहे आणि शिवाचा वासतर प्रत्येक जागेवर असतो.