बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

हे आहे साई बाबांचे वास्तविक जन्मस्थान

महाराष्ट्राच्या पाथरी (पातरी) गांवात साई बाबांचा जन्म 28 सप्टेंबर 1835 साली झाला होता. काही लोकांचे म्हणणे आहे की त्यांचा जन्म  27 सप्टेंबर 1838 रोजी तत्कालीन आंध्रप्रदेशच्या पथरी गावात झाला होता आणि त्यांचा मृत्यू 28 सप्टेंबर 1918 रोजी शिर्डीत झाला. साई बाबांबद्दल सर्वात जास्त खरोखरी माहिती सत्य साई बाबांनी दिली आहे, ज्यांना बाबांचा अवतार मानला जातो. त्यांनी त्यांचा जन्मस्थळ पाथरी गांव म्हटले आहे, तर तेच सर्वमान्य आहे. 
 
बर्‍याच लोकांचे म्हणणे आहे की साईंना पहिल्यांदा 1852 मध्ये प्रथमच शिर्डीत ब‍घितले होते. नंतर ते तेथून निघून गेले व चार वर्षांनंतर परत आले होते. जास्त जागांवर असे लि‍हण्यात आले आहे की साईं बाबा 1854मध्ये पहिल्यांदाच शिर्डीत दिसले होते, तेव्हा ते किशोरावस्थेत होते. जर त्यांचे वय तेव्हा 16 वर्ष होते, तर त्यांचा जन्म 1838 मध्ये झाला असावा. स्वत:ला सांईचा अवतार मानणारे  सत्य साईंबाबांनी बाबांचा जन्म 27 सप्टेंबर 1830 मध्ये महाराष्ट्राच्या पाथरी (पातरी) गांवात झाल्याचा सांगितले आहे. या सत्य साईंची गोष्ट ऐकली तर शिर्डित साईंच्या आगमनावेळी त्यांचे वय 23 ते 25च्या मध्ये असावी. सत्य साईंबाबांचा अनुमान योग्य वाटतो कारण त्यांच्या जीवन यात्रेवर विचार केला तर त्यांचे याच वयात शिर्डीत प्रवेश झाले असावे.  
 
असा विश्वास आहे की महाराष्ट्रच्या परभणी जिल्ह्याच्या पाथरी गांवात सांई बाबांचा जन्म झाला होता आणि सेल्युमध्ये बाबांचे गुरु वैकुंशा राहत होते. हा भाग हैदराबाद निजामशाहीचा एक भाग होता. भाषेच्या आधारावर प्रांत रचनेच्या वेळेस हा भाग महाराष्ट्रात आला तेव्हापासून हा भाग महाराष्ट्राचा एक भाग आहे. 
 
महाभारत काळात पांडवांनी येथे अश्वमेध यज्ञ केले होते, तेव्हा अर्जुन आपली फौज घेऊन येथे उपस्थित होते. अर्जुनला पार्थही म्हणतात. हेच पार्थ आता पाथरी झाले आहे. त्याला आता पातरी व पात्री म्हणतात.