शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. होळी
Written By सौ. अर्चना गजेंद्र भटूरकर|

फाफडा (पंजाबी पदार्थ)

ND
साहित्य : दोन वाट्या चण्याचे बारीक पीठ, दोन चमचे ओवा, एक चमचा जिरे, हळद, पाऊण चमचा तिखट, मीठ, हिंग, एक कप दूध.

कृती : चण्याच्या पिठात थोडे मोहन घालावे व ओवा, जिरे, हळद, हिंग तिखट व चवीप्रमाणे मीठ हे जिन्नस घालून चांगले मिसळावे. त्यात दूध घालून पीठ भिजवावे व दोन तास ठेवून द्यावे. नंतर ते चांगले मळावे व पातळ पापडासारखे लाटून तेलात तळावे.