गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. होळी
Written By मनोज पोलादे|

श्रीखंड

ND
साहित्य- दही दोन लिटर, साखर पाऊण किलो, विलायची 20 ग्रॅम, बादाम व काजू पन्नास ग्रॅम

पूर्वतयारी- दही पांढरया शुभ्र कापडात बांधुन लटकवून ठेवावे बादाम व काजूचे बारीक तुकडे करावे विलायची बारीक करायची

कृती- तासभर्‍या नंतर दही कापडातून पातेल्यात काढावे. संपूर्ण पाणी निघून गेल्याची खात्री करावी. साखर मिक्सर मधून काढून पिठी करावी. साखरेची पिठी पाणी काढलेल्या दह्यात मिसळावी. बारीक केलेले बादाम व काजू मिश्रणात घालावे. विलायची घालावी. मिश्रण चमच्याने फेटून घ्यावे.

तयार झालेले श्रीखंड थंड होण्यासाठी फ्रिज मध्ये ठेवावे. गव्हाची पोळी किवा रताळ्याच्या पोळ्यां सोबत मस्त मेजवानी झोडायची.