शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. होळी
Written By

संकटापासून मुक्तीसाठी होळीवर अमलात आण हे 8 उपाय

तंत्र-मंत्र सिद्धीसाठी होळीची रात्र दिवाळी, जन्माष्टमी, आणि शिवरात्रीप्रमाणेच महत्त्वाची आहे. या दिवशी काही सोपे उपाय अमलात आणून कष्ट दूर केले जाऊ शकतात.
* होलिका दहन आणि त्याच्या दर्शनाने शनी-राहू-केतूच्या दोषांपासून शांती मिळते.
* होळीच्या भस्म कपाळावर लावल्याने नजर दोष आणि प्रेतबाधांपासून मुक्ती मिळते.
* होळीची राख घरात चांदीच्या डबीत ठेवल्याने अनेक बाधा स्वत: दूर होतात.

* कामात बाधा येत असल्यास कणकेच्या चौमुख दिव्यात मोहरीचे तेल, काळे तीळ, एक बत्ताशा, शेंदूर आणि एक तांब्याचा शिक्का टाका. होळीच्या अग्नीने हा पेटवून घरातील आजारी व्यक्तीवरून ओवाळून एकांत चौरस्त्यावर ठेवून मागे न बघता परतून हात- पाय धुऊन घरात प्रवेश करावे.
* तीन गोमती चक्र हातात घेऊन आपले इच्छित कार्य 21 वेळा मनात म्हणावे. गोमती चक्र होळीत टाकून भक्तिभावाने नमस्कार करून येऊन जावे.
* विपत्ती नाश करण्यासाठी निम्न मंत्राची 108 वेळा आहुती द्या आणि नित्य यशाशक्ती जप करा. मंत्र: राजीव नयन धरें धनु सायक। भगति विपत्ती भंजन सुखदायक।।

* विविध रोग आणि उपद्रव शांती साठी मंत्र: दैहिक दैविक भौतिक तापा, राम राज नहिं काहुहिं व्यापा।।
* जीविका प्राप्तीसाठी: बिस्व भरन पोषन कर जोई, ताकर नाम भरत अस होई।।