testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

स्वातंत्र्यदिन आणि आपण

independence day
हा आपला स्वातंत्र्यदिन म्हणून आपण साजरा करतो. 1947 साली भारतभूमी ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतून मुक्त झाली. भारताच्या स्वातंत्र्याला आता पासष्ट वर्षे उलटून गेली आहेत. परंतु अजूनही आपणास स्वातंत्र्याचा खरा अर्थ कळला असे म्हणणे धाडसाचेच ठरेल. पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी हे दोन दिवस भारतीय नागरिकांसाठी राष्ट्रीय सण आहेत. भारत आज एक प्रबळ प्रजासत्ताक म्हणून जगामध्ये दमदारपणे वाटचाल करताना दिसते. स्वातंत्र्य मिळण्यासाठी असंख्य हुतात्म्यांची आहुती पडली, अनेक क्रांतिकारक फासावर गेले तेव्हा भारतीयांना स्वातंत्र्याचा प्रकाश दिसू शकला आहे. परंतु स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या देशभक्तांच्या बलिदानाची आज कुणालाच फिकीर नाही याचा अनुभव वारंवार येतो. राजकीय सत्ता व त्या माध्यमातून मिळणारी अफाट संपत्ती जमा करण्याकडेच राजकारणी मंडळी लक्ष ठेवून आहेत.

स्वातंत्र्यदिनदिवशी तिरंगा ध्वजापुढे अभिवादन केले की आपली इतिकर्तव्यता संपली अशी मनोधारणा झालेल्या पुढार्‍यांचे काय करणार? लोकशाहीमध्ये जनता हीच खरी मालक असते, हेच हे राजकारणी विसरत चालले आहेत. देशावर प्रेम करणे म्हणजे भ्रष्टाचार न करणे, हिंसाचार न करणे, प्रामाणिक वागणे या गोष्टी मनावर ठसणे आवश्यक असताना आजच्या काळात देशभक्तीचीच तीव्र टंचाई निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक भारतीयाने आपल्या देशावर सदासर्वकाळ प्रेम केले पाहिजे. देशावर प्रेम म्हणजेच येथील परंपरा, संस्कार आणि सर्वसामान्य लोकांवरही प्रेम करणे आलेच.
प्रतीक निकाळजे, सोलापूर


यावर अधिक वाचा :

मालवाहतूक ट्रकचालकांचा २० जुलैला देशव्यापी संप

national news
दररोज वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीने सर्वच हैराण झालेत. पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे ...

इंधन दरवाढीचा बारावा दिवस, पुन्हा एकदा किंमती वाढल्या

national news
पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. इतिहासात पहिल्यांदाच राज्यातल्या ...

'ती' ऐतिहासिक भेट रद्द

national news
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी नॉर्थ कोरियाचा हुकूमशहा किम जोंग ...

राष्ट्रीयीकृत बँक कर्मचारी,अधिकारी ३० मे ला संपावर

national news
राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्मचारी आणि अधिकारी यांनी ३० मे रोजी संप पुकारला आहे. भारतीय बँक ...

आयपीएलची फायनल फिक्स असल्याचा दावा

national news
आयपीएलचा दुसरा एलिमिनेटर सामना होण्यापूर्वीच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झालाय. या ...

मायक्रोमॅक्सचा पहिला एंड्रॉयड गो बेस्ट स्मार्टफोन

national news
मायक्रोमॅक्स भारत गो कंपनीचा पहिला एंड्रॉयड गो बेस्ट स्मार्टफोन आहे. कंपनीने याची किंमत ...

Moto G6 भारतात 4 जूनला होईल लाँच, अमेजनवर होईल याची विक्री

national news
लेनोवो स्वामित्व असणारी कंपनी मोटोरोला आपला नवीन स्मार्टफोन लाँच करत आहे ज्याचे नाव आहे ...

आंतरराष्ट्रीय कूपन कोड कंपनी पिकोडी, आता भारतात

national news
इंटरनेटवर सर्वात फायदेशीर ऑनलाईन डील आणि कूपन सर्च मध्ये उत्कृष्ट प्रदर्शन देणारी ऑनलाईन ...

बीएसएनएलचा 'डेटा त्सुनामी' प्लान

national news
बीएसएनएल (BSNL)ने नवा प्लान जाहीर केलाय. जियो आणि एअरटेलला टक्कर देण्यासाठी बीएसएनएलने ...

फेसबुकवर अमिताभ बच्चन यांचा नवा रेकॉर्ड

national news
महानायक अमिताभ बच्चन यांनी अजून एक रेकॉर्ड केला आहे. नुकताच त्यांनी फेसबुकवर ३ कोटी ...