गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. युद्धाचे ढग
Written By वेबदुनिया|
Last Modified: इस्लामाबाद , बुधवार, 31 डिसेंबर 2008 (19:48 IST)

अखेर पाकिस्तान नरमले

वाढता आंतरराष्ट्रीय दबाव आणि भारताने केलेली लष्करी कारवाईची तयारी यामुळे भयभीत झालेल्या पाकिस्तानचा भारतविरोधी सूर काहीसा मवाळ झाला आहे. भारताबरोबर आम्हाला कोणत्याही प्रकारचा लष्करी संघर्ष नकोय, असे म्हणत पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी शांततेची भाषा सुरू केलीय.

आमची युद्धाची तयारी आहे, असे सांगणारे गिलानी अचानक मवाळ झाले असून, आमच्या शेजार्‍यांबरोबर आम्हाला कोणत्याही प्रकारचा संघर्ष नको आहे. आम्हाला त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध हवे आहेत, असे त्यांनी आज सांगितले.

बेनझीर भुट्टो यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. अर्थात, पाकिस्तानला डिवचल्यास परिणाम भोगण्यास तयार रहा, असे सांगून 'आम्ही स्वतःहून कारवाई करणार नाही. मात्र, तिकडून कारवाई झाल्यास त्याला उत्तर देऊ, असे सांगत भाषा मवाळ झाली तरी पवित्रा आक्रमक आहे, हे दाखवून देण्याचा फुकाचा प्रयत्नही केला.

आम्ही स्वतःहून आक्रमण करणार नाही. पण कुणी केल्यास आमच्या प्रिय देशाचे रक्षण करण्यास आम्ही सक्षम आहोत, हे सांगण्यासही ते विसरले नाहीत.