शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. युद्धाचे ढग
Written By वेबदुनिया|
Last Modified: वाघा सीमा , बुधवार, 31 डिसेंबर 2008 (19:48 IST)

भारत-पाक तणावाचा वाघा सीमेवर परिणाम

मुंबई हल्‍ल्‍यानंतर भारत आणि पाकिस्‍तान यांच्‍यात निर्माण झालेल्‍या तणावाचा परिणाम अटारी-वाघा या दोन्‍ही देशांच्‍या सीमेवरही पहायला मिळाला आहे. रोज सायंकाळी सीमेवर दोन्‍ही बाजूने सैनिक समोरा-समोर येऊन देशाचा ध्‍वज उतरवित असतात. यावेळी दोन्‍ही देशांच्‍या सैनिकांमध्‍ये चांगलाच जोश पाहिला जात असतो.

मात्र सध्‍या युद्धजन्‍य परिस्थिती निर्माण झाल्‍याने दोन्‍ही बाजूच्‍या जवानांमध्‍ये अधिक आक्रमकता दिसत आहे. युध्‍द स्थिती निर्माण झाल्‍याने दोन्‍ही बाजूच्‍या जवानांकडून जोरदार घोषणाबाजी केली केली जाते. अमृतसर येथून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्‍या अटारी-वाघा आंतरराष्‍ट्रीय सीमेवर 'रिट्रीट' समारंभाच्‍या वेळी दोन्‍ही बाजूच्‍या जवानांमध्‍ये आक्रमकता दिसत असली तरीही मुंबईवरील हल्‍ल्‍यानंतर त्‍यात वाढ झाली आहे.