गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 एप्रिल 2017 (14:38 IST)

पॅरिसमध्ये दहशतवादी हल्ला, इसिसने स्वीकारली जबाबदारी

मध्य पॅरिसमध्ये गुरुवारी रात्री झालेल्या गोळीबाराची जबाबदारी इसिसने स्वीकारली आहे. या हल्ल्यात एक फ्रेंच पोलीस अधिकारी ठार झाला असून दोन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. फ्रान्समध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला तीन दिवस उरले असताना हा हल्ला झाला. 23 एप्रिलला फ्रान्समध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रानकोईस ओलांद यांनी हा गोळीबार दहशतवादाचा प्रकार असल्याचे सांगितले. गोळीबार करणारा हल्लेखोर पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत ठार झाला.  या भागात आर्स डी ट्रीओमफे ही प्रसिध्द वास्तू इथे नेहमीच वर्दळ आणि गर्दी असते.