गुरूवार, 28 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By भाषा|

बाराव्या शतकातील मॅग्नाकार्टाचा लिलाव

तब्बल आठशे वर्षापूर्वी इतिहासकात पहिल्यांदाच मानवाधिकाराची व्याख्या करणाऱ्या मॅग्नाकार्टाच्या 17 हस्तलिखितांपैकी एकाचा लिलाव दोन कोटी दहा लाख डॉलरला झाला. सदबी या आंतरराष्ट्रीय लिलाव करणाऱ्या संस्थेमार्फत हा लिलाव झाला.

या महत्वपूर्ण दस्तऐवजाचा काल लिलाव करण्यात आला. एकाने फोनद्वारे बोली लावली होती. लिलावापूर्वी हा दस्तावेज दोन ते तीन कोटीच्या दरम्यान विकला जाण्याचा अंदाज व्यक्त केला होता.

इंग्लिश रॉयल चार्टर मॅग्नाकार्टा 1297 मध्ये प्रकाशित झाली होती. त्यावर ब्रिटनचे महाराज एडवर्ड (पहिले) यांची स्वाक्षरी आहे.
सदबीचे लिलावकर्ता रिडेन यांनी सांगितले की, या लिपीला जगातील सर्वात महत्वाचा दस्तावेज मानले जाते. स्वातंत्र्याची व्याख्या करणार्‍या काही महान दस्तावेजांपैकी मॅग्नाकार्टा एक आहे.

ते पुढे म्हणाले की, डिक्लेरेशन ऑफ इंडीपेंडन्स द कॉन्स्टीट्यूशन किंवा बिल ऑफ राइट्स यांचे पूर्वज शोधण्याचा प्रयत्न केला तर ते मॅग्नाकार्टा होय. मॅग्नाकार्टाच्या उपल्ब्ध असलेल्या 17 हस्तलिखितांपैकी पहिल्यांदाच एका हस्तलिखितांचा लिलाव झाला असून बाकीची हस्तलिखिते ब्रिटनच्या राष्ट्रीय अभिलेखागार कॅथेड्रल्स किंवा विद्यापीठात आहेत. याशिवाय एक हस्तलिखित ऑस्ट्रेलियात आहे.