Widgets Magazine
Widgets Magazine

मॅक्‍सिकोत बंदूकधाऱ्याच्या गोळीबारात 11 जणांचा मृत्यू

हिडाल्गो (मॅक्‍सिको)| Last Modified सोमवार, 17 जुलै 2017 (11:17 IST)
शहरात एका बंदूकधारी व्यक्तीने 11 जणांची हत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. जायुका शहरातील एका घरात मेजवानीसाठी हे 11 जण जमले होते. तेव्हा एका बंदुकधारी व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 7 पुरुष तर 4 महिलांचा समावेश आहे. ही घटना गुरुवारी रात्री घडली.
Widgets Magazine
आरोपीने कानटोपी परिधान केल्यामुळे त्याची ओळख पटू शकलेली नाही. काही मुले या हल्ल्‌यातून बचावली आहेत. आपत्कालीन सेवा क्रमांकावर सकाळी 12 वाजून 10 मिनिटांना मदतीची याचना करणारा एक कॉल आला. त्यानंतर ही घटना उघडकीस आली, अशी माहिती पब्लिक सेफ्टी सचिवालयाचे प्रवक्ते यांनी दिली. पोलीस व चिकित्सक जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना घरात 11 जण मृतावस्थेत दिसले. घटनास्थळी पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असून पोलीस तपास करत आहेत, अशी माहितीही सचिवालयाच्या प्रवक्त्‌याने दिली.

Widgets Magazine

यावर अधिक वाचा :