शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: दमास्कस , बुधवार, 2 सप्टेंबर 2015 (10:41 IST)

2,000 वर्षे जुने मंदिर इसिसकडून उद्ध्वस्त

सीरियातील ऐतिहासिकदृष्टय़ा अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या पालमिरा शहरामधील ‘टेम्पल ऑफ बेल’ हे प्राचीन मंदिर इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेने उद्ध्वस्त केल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
उपग्रहाद्वारे मिळविण्यात आलेल्या छायाचित्रामधून हे मंदिर जवळजवळ पूर्णत: उद्ध्वस्त झाल्याचे दिसून येते. या मंदिराची मूळ रचना अत्यंत भक्कम असल्याचे सीरियामधील पुरातत्त्व विभाग प्रमुखांनी सांगितले होते. मात्र, आता हाती आलेल्या नव्या माहितीनुसार या ठिकाणी काहीही शिल्लक उरले नसल्याचे संयुक्त राष्ट्रसंघामधील अधिकार्‍यांनी सांगितले आहे. मुख्य मंदिर इमारतीसह येथील स्तंभही इसिसने उद्ध्वस्त केले आहेत. येथील एका स्थानिक व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार अखिल मानवजातीसाठी अमूल्य ठेवा असलेल्या या मंदिराचे प्रवेशद्वार व सीमा¨भत केवळ इसिसच्या तावडीतून सुटले आहे.
 
पालमिरा शहर हे युनेस्कोने आंतरराष्ट्रीय वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. परंतु इसिसने या शहरासहित इराकमधीलही काही अत्यंत महत्त्वपूर्ण वारसास्थळे उद्ध्वस्त केली आहेत. हे मंदिर सुमारे 2 हजार वर्षापूर्वी बांधण्यात आले असून यामध्ये फोनेशियन संस्कृतीच्या देवता असल्याचे सूत्रांनी सांगितले. ही मंदिरे इस्लामच्या शिकवणुकीविरोधी असल्याची इसिसची भूमिका आहे.