testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

लंडनमध्ये 27 मजली इमारतीला आग

लंडन|
लंडन येथील लॉनकॉस्टर वेस्ट इस्टेट टॉवर या गगनचुंबी 27 मजली इमारतीला भीषण आग लागली आहे. आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाचे 40 बंब आणि बचाव दलाचे 200 जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
या घटनेत दोन जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. या इमारतीमध्ये 120 कुटुंबे अडकल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे. दुसऱ्या मजल्याला आग लागली असून ती 27 व्या मजल्यापर्यंत पसरली आहे.

- भीषण आगीमुळे ग्रेनफेल टॉवर एका बाजूला कलला असून तो कोसळण्याची शक्यता आहे.

- लंडन अॅम्ब्युलन्स सेवेला रात्री 1.30 वाजता आग लागल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी 20 अॅम्ब्युलन्स तात्काळ घटनास्थळी पाठवल्या. गंभीर जखमी झालेल्यांना तात्काळ उपचार मिळावेत यासाठी आम्ही शक्य ते सर्व प्रयत्न करीत आहेत.

- लंडनमधील अॅम्ब्युलन्स सेवेने ग्रेनफेल टॉवरच्या आसपासच्या इमारतीत रहाणा-या रहिवाशांना घराचे दरवाजे, खिडक्या बंद करुन घेण्यास सांगितले आहे. कारण धुराच्या लोटामुळे त्रास होऊ शकतो.यावर अधिक वाचा :