testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

'त्या' पाकिस्तानी बाळाचा मृत्यू

pakistani baby

मेडिकल व्हिसा काढून हार्ट सर्जरीसाठी भारतात आलेल्या पाकिस्तानी बाळाचा मृत्यू झाला आहे. रोहन सादिक(४ महिने) असे मृत्‍यू झालेल्‍या बाळाचे नाव आहे. सोमवारी लाहोरमधील घरी परतल्यानंतर डिहायड्रेशनमुळे रोहनचा मृत्‍यू झाला.

रोहनच्या हृदयात भोक असल्यामुळे शस्त्रक्रियेसाठी त्याला पाकिस्तानहून भारतात आणायचे होते. भारत-पाकिस्तानमधील ताणलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर कंवल यांना मेडिकल व्हिसा मिळवण्यात अडथळे येत होते. अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या मदतीने कंवल यांना व्हिसा मिळाला.
१२ जुलै रोजी रोहनला भारतात आणण्यात आले. त्याच्यावर नोएडातील जेपी हॉस्पिटलमधील डॉ. राजेश शर्मा आणि यांच्या टीम १४ तारखेला शस्त्रक्रिया केली. सर्जरीनंतर रोहनच्या कुटुंबीयांनी भारत सरकार आणि स्वराज यांचे आभारही मानले होते.यावर अधिक वाचा :