मंगळवार, 19 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 27 ऑक्टोबर 2016 (14:10 IST)

वैद्यकीय शास्त्राची किमया, लीनलीचा झाला दोन वेळा जन्म

अमेरिकेच्या टेक्सासमध्ये डॉक्टरांनी वैद्यकीय क्षेत्रातील मोठी किमया करत एकाच बाळाला दोन वेळा जन्म दिला आहे. यात पाच महिन्यांच्या लीनलीला शस्त्रक्रियेसाठी आईच्या गर्भातून बाहेर काढून पुन्हा गर्भात ठेवले. त्यानंतर नऊ महिने पूर्ण झाल्यावर लीनलीने इतर बाळांप्रमाणे पुन्हा जन्म घेतला. लीनलीच्या पूर्नजन्माचे संपूर्ण श्रेय चिल्ड्रन हॉस्पिटलचे डॉक्टर डॅरेल कास यांच्या टीमला जाते.  
 
एका सोनोग्राफी चाचणीमध्ये डॉक्टरांनी मार्गारेटला लीनलीच्या पाठिला टयुमर असल्याचे सांगितले. त्यावेळी मार्गारेट चार महिन्यांची गर्भवती होती. टयुमरच्या आकारमानामुळे लीनलीचे ह्दय बंद पडून मृत्यू होणार होता. यामध्ये मार्गारेट समोर फक्त दोनच पर्याय होते. एक गर्भपात किंवा गर्भातून बाळाला बाहेर काढून शस्त्रक्रिया. मार्गारेटने दुसरा पर्याय निवडला. त्यानुसार डॉक्टरांनी पाचव्या महिन्यात मार्गारेटच्या गर्भातून लीनलीला बाहेर काढून शस्त्रक्रियेव्दारे टयुमर काढून टाकला व पुन्हा लीनलीला पुन्हा आईच्या गर्भात ठेवले.  त्यानंतर नऊ महिन्यांनी दिवस भरल्यानंतर लीनलीचा जन्म झाला. लीनलीची प्रकृती आता उत्तम असून डॉक्टरांनी लीनलीला तिच्या आईकडे सोपवले.