शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 16 नोव्हेंबर 2016 (11:30 IST)

‘या’ सेवा-सुविधा मिळणार आहे रिटायरमेंटनंतरही ओबामांना !

यूएस प्रेसिडेंट बराक ओबामा यांचे रिटायरमेंटचे आता काहीच दिवस राहिले आहेत. मात्र, प्रेसिडेंटपदाची जबाबदारी संपल्यानंतरही त्यांना अनेक प्रकारच्या फॅसिलिटीज आणि बेनिफिट्स मिळत राहतील. 1958 च्या पूर्वी कोणत्याही रिटायर्ड यूएस प्रेसिडेंटला कोणत्याही प्रकारची सुविधा, पेंन्शन दिली जात नव्हती. मात्र, नंतर अमेरिकन काँग्रेसमध्ये कायदा संमत व दुरुस्ती करून माजी राष्ट्राध्यक्षांनाही सेवा-सुविधा देण्याचा निर्णय घेतला गेला.
 
पेन्शन- बराक ओबामाला पेन्शनच्या रूपाने वार्षिक 1.36 कोटी रुपये मिळतील. ही पेन्शन त्यांनी व्हाईट हाऊसचे ऑफिस सोडताच सुरु होईल. तसेच यावर ओबामाना टॅक्स भरावा लागेल.
 
ट्रान्सिशन फंड- रिटायरमेंटनंतर बराक ओबामांना ट्रान्सिशन फंड सुद्धा मिळेल. हा फंड त्यांना ऑफिस सोडल्यानंतर 7 महिन्यांपर्यंत मिळेल. यात ऑफिस स्पेस, स्टाफ कॅम्पेनसेशन, कम्युनिकेशन सर्विस, प्रिंटिंग आणि पोस्टाशी संबंधित खर्च असेल.
  
बराक ओबामांना प्रेसिडेंट पदावरून पायउतार झाल्यानंतरही लाईफ टाईम सिक्रेट सर्विस प्रोटेक्शन असेल.
 
मेडिकल इंश्योरन्स- ओबामा व त्यांचे कुटुंबिय मिलिट्री हॉस्पिटल्समध्ये आपले उपचार करू शकतील. त्यांना सरकारच्या हेल्थ बेनिफिट्स प्रोग्रॅमनुसार हेल्थ इंश्योरन्स सुद्धा मिळेल.
 
ट्रॅव्हल एक्सपेन्स- ओबामा रिटायरमेंटनंतरही जर ऑफिशियल विजिटवर गेले तर त्यांना ट्रॅव्हल एक्सपेन्स मिळेल. अनऑफिशियली विजिट केली तर त्यांना काहीही मिळणार नाही.